Koli Bandhav and Warakari on Krishnakunj to present their problems

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं नारायण राणे यांचं अभिनंदन

पुणे महाराष्ट्र राजकारण

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले खासदार नारायण राणे यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच, पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेना, काँग्रेस, स्वत:चा स्वाभिमान पक्ष आणि आता भाजप असा प्रवास करणारे नारायण राणे यांना मोदी सरकारमध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेत असताना नारायण राणे यांचे राज ठाकरेंशी चांगले संबंध होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले कि, “मी नारायण राणे यांना फोन केला होता. मात्र, त्यांचे दोन्ही फोन बंद होते. त्यांच्या मुलांचेही फोन बंद होते. त्यामुळे शुभेच्छा देता आल्या नाहीत. पुन्हा फोन करेन, असं ते काल म्हणाले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांनी नारायण राणे यांच्याशी फोनवरून चर्चा केली व मंत्रिपदाबद्दल अभिनंदन केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत