शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी २१ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांना एकमेकांच्या शेजारी बसलेले पाहून संजय राऊत यांनी तीव्र शब्दात टीका केली. राऊत यांनी पंतप्रधान […]
टॅग: Sharad Pawar
संजय राऊतांचा एकनाथ शिंदे आणि शरद पवारांवर तिव्र हल्ला; पैशांच्या जोरावर उभे केलेले बालेकिल्ले आणि अमित शाहांच्या मदतीने पक्ष फोडले असा गंभीर आरोप!
मुंबई: एकनाथ शिंदे यांचा कोणताही बालेकिल्ला नाही, त्यांनी पैशांच्या जोरावर काही बालेकिल्ले उभे केले आहेत. शिंदे यांनी ५० वर्षांत कोणतं महान कार्य केले आहे की बालेकिल्ले उभारले? ते काय लोकमान्य टिळक आहेत? त्यांची विचारधारा काय आहे? ते काय वल्लभभाई पटेल आहेत? दीनदयाळ उपाध्याय आहेत? अटलबिहारी वाजपेयी आहेत? ज्या दिवशी अमित शाह राहणार नाहीत, त्यादिवशी यांची […]
उद्धव ठाकरे शिंदेंना मुख्यमंत्री करणार होते, पण शरद पवारांनी अडथळा घातला; संजय राऊतांचा धक्कादायक खुलासा
मुंबई: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि शिवसेनेतील फूट, यावर नवीन वाद उभा राहिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं, ज्यात त्यांनी स्पष्ट केलं की, “जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते, तर शिवसेना फुटली नसती. आम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव केला.” त्यांच्या या आरोपावर प्रतिक्रिया देताना, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक खळबळजनक […]
विरोधक लाडक्या बहिणीचे सावत्र भाऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकवर टीका; म्हणाले, तेव्हा निवडणुका होत्या का?
मुंबई : महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना जाहीर केली असली तरी राज्याकडे पैसे नाहीत. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या घोषणा करण्यात आल्या, असा आरोप विरोधकांकडून होत असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, विरोधकांच्या या वावड्या आहेत. विरोधकांना पोटदुखी झालेली आहे. मी कालही […]
अजित पवारांना धक्का! काल अजितदादांसोबत असलेल्या अमोल कोल्हेंनी आज भूमिका बदलली…
पुणे : शरद पवार यांच्याविरुद्ध बंड करत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आणि काल उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला राष्ट्रवादीचे अनेक आमदार उपस्थित होते. सुनिल तटकरे आणि अमोल कोल्हे हे दोन खासदारही उपस्थित होते. मात्र आता अमोल कोल्हे यांनी मी शरद पवारांसोबत राहणार असल्याचं आज स्पष्ट केलं आहे. अमोल कोल्हे यांनी ट्विट करत […]
शरद पवारांच्या घोषणेनंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया, जबाबदारी दिल्याबद्दल मानले आभार…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा या आधी केली होती. त्याचवेळी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे चर्चेत […]
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; पुढील तीन दिवस उपचार घेणार
मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. पुढील तीन दिवस ते रुग्णालयात असणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आली आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी एक पत्र प्रसिद्ध केले आहे. यात ‘शरद पवार यांची […]
यापूर्वी असे कधीही पहिले नाही, पवारांनी लगावला राज्यपाल कोश्यारींना टोला…
मुंबई : शिवसेना बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता सर्वच आमदारांना घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. शपथविधीनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. तसेच दोन्ही नेत्यांना पेढाही भरवला. या पेढा भरवतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले. आता राष्ट्रवादी […]
भूमिका बदलली नाही आणि शब्द पाळला तर ते शरद पवार कसले?: निलेश राणे
मुंबई: राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्धार केलेले संभाजीराजे छत्रपती यांचा पाठिंबा ऐनवेळी मागे घेतल्याच्या मुद्द्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. हे होणारच होते. पवार साहेब आणि शब्द पाळला, असे होऊ शकत नाही. भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले? राजे जर शिवसेनेसोबत जाणार तर संजय राऊत दुसऱ्या […]
संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला शरद पवार यांचा पाठिंबा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे. आमचा एक उमेदवार निवडून येण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर राहिलेली मत त्यांना देऊ असं शरद पवार म्हणाले आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेवरील राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत संपल्यानंतर पत्रकार परिषद घेत नवी राजकीय भूमिका जाहीर केली होती. […]