पुणे : शरद पवार यांच्याविरुद्ध बंड करत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आणि काल उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला राष्ट्रवादीचे अनेक आमदार उपस्थित होते. सुनिल तटकरे आणि अमोल कोल्हे हे दोन खासदारही उपस्थित होते. मात्र आता अमोल कोल्हे यांनी मी शरद पवारांसोबत राहणार असल्याचं आज स्पष्ट केलं आहे.
अमोल कोल्हे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है…पर दिल कभी नहीं,’ असं म्हणत मी शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच अमोल कोल्हे यांनी यावेळी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील एक व्हिडिओही ट्वीट केला आहे. ‘सगळं विसरायचं, पण बापाला नाही विसरायचं. त्याला भेटल्याने, जवळ बसल्याने, मायेने विचारपूस केल्याने कणसाळतो, कुंभारतो. त्याला नाही विसरायचं,’ असं अमोल कोल्हे या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत.
जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं।#मी_साहेबांसोबत @NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @TV9Marathi @SakalMediaNews @abpmajhatv @mataonline @SaamanaOnline @SarkarnamaNews @thodkyaat… pic.twitter.com/2kAhkkfnjd
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 3, 2023
दरम्यान, साहेब सांगतील तेच धोरण आणि साहेब बांधतील तेच तोरण, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. खासदार कोल्हे यांनी दुसऱ्याच दिवशी भूमिका बदल्याने अजित पवार यांच्यासाठी हा नक्कीच धक्का असेल.