मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा या आधी केली होती. त्याचवेळी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे चर्चेत होती. अखेर दोन कार्यकारी अध्यक्ष निवडण्यात आले असून यात सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाब या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणे प्रफुल्ल पटेल यांना देखील कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पटेल आधीपासूनच राष्ट्रीय कार्यकारिणीत सक्रिय आहेत. मी सुरुवातीपासून काम करत आल्यामुळे माझ्यासाठी ही जबाबदारी मोठी नसल्याचे पटेल यांनी म्हटले आहे. हे पद जरी नवीन असले तरी माझ्यासाठी हे काम तेच जुने असल्याचे पटेल म्हणाले.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या कि, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार.”
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे…
— Supriya Sule (@supriya_sule) June 10, 2023




