Yes I will be free from addiction
पुणे महाराष्ट्र व्यसनमुक्ती

पुस्तक परिचय – होय, मी व्यसनातून मुक्त होणारच – झुंबरराव खराडे

पुणे : समाजात दिवसेंदिवस व्यसनाची तीव्रता वाढत आहे, आजकाल अनेकजण व्यसनाच्या आहारी गेले आहेत ही चिंतेची बाब आहे. व्यसनाधीन व्यक्तीच्या कुटुंबावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्याच्या कुटुंबात नेहमी भांडणे, कलह आणि अशांतता असते. व्यसनांचा परिणाम व्यसनी माणसाच्या कुटुंबासह समाजावर देखील होतो. जसे कि दारू पिऊन गाडी चालवल्याने अपघात होण्याची शक्यता असते, अगदी निष्पाप व्यक्तीचाही बळी जाऊ शकतो. एकूण परिस्थितीचा विचार करता समाजाला व्यसनाच्या विळख्यातून मुक्त करण्याची गरज आहे, त्यासाठी व्यसनाधीन व्यक्तीला व्यसनाची भीषणता दाखवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यासाठी अनेक सुजाण नागरिक व्यसनमुक्तीच्या कार्यात सहभागी होत आहेत, अनेकजण विविध माध्यमांतून व्यसनमुक्तीचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहेत आणि त्यातीलच एक भाग म्हणजे लेखक झुंबरराव खराडे यांचे ‘होय, मी व्यसनातून मुक्त होणारच!’ हे पुस्तक.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या कामात लेखकाचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. या पुस्तकात लेखकाने व्यसनाची कारणे, व्यसनामुळे होणारी हानी, व्यसनाचे दुष्परिणाम, व्यसनासाठी होणारा प्रचंड खर्च आणि पर्यायाने होणारे आर्थिक नुकसान, व्यसन सोडल्यानंतर होणारे फायदे या सर्व बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्याचबरोबर व्यसन सोडल्यानंतर कोणती काळजी घ्यावी, व्यसनमुक्ती का गरजेची आहे, व्यसनापासून दूर राहण्यासाठी काय करावे, याची सविस्तर माहिती दिली आहे. मुख्य म्हणजे लेखकाने व्यसनाधीनांचे वास्तव अनुभव पुस्तकात मांडले आहेत, त्यामुळे हे पुस्तक अतिशय प्रभावी ठरते. प्रत्यक्ष व्यसनाधीन व्यक्तींनी सांगितलेले वैयक्तिक अनुभव तुम्हाला व्यसनाबद्दल गांभीर्याने विचार करायला लावतात. गुटख्याच्या व्यसनामुळे कर्करोग झालेल्या व्यक्तीचा अनुभव आपल्याला थक्क करून सोडतो आणि व्यसनमुक्तीचे महत्त्वही अधोरेखित करतो. तसेच लेखक झुंबरराव खराडे हे व्यसनमुक्तीसाठी काम करणारे कार्यकर्ते आहेत. 21 वर्षे व्यसनमुक्तीसाठी काम करत असून, त्यांना व्यसनमुक्ती कार्यासोबतच सामाजिक कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

‘होय, मी व्यसनातून मुक्त होणारच!’ हे पुस्तक व्यसनापासून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला मार्गदर्शन करते. तसेच व्यसनाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते. त्यांनी व्यसन कसे सोडावे, त्यानंतर काय काळजी घ्यावी, पुन्हा व्यसनाकडे आकर्षित होऊ नये यासाठी काय करावे याबाबत यथायोग्य मार्गदर्शन केले आहे. व्यसनमुक्ती केंद्रांचे पत्तेही या पुस्तकात दिले आहेत. व्यसनमुक्तीच्या कार्यात हे पुस्तक अनमोल ठरेल यात शंका नाही. तसेच अनेक व्यसनाधीनांना व्यसनापासून दूर राहण्याची प्रेरणा मिळेल. लेखक झुंबरराव खराडे यांनी व्यसनमुक्तीच्या सर्व पैलूंवर मोजक्या शब्दांत प्रकाश टाकल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

पुस्तकाचं नाव : होय, मी व्यसनातून मुक्त होणारच
लेखक : झुंबरराव आंनदा खराडे
फोन : ९५६१९ ५५७३५
पृष्ठ : १११
मूल्य : १२० रुपये..

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत