मुंबई : महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना जाहीर केली असली तरी राज्याकडे पैसे नाहीत. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या घोषणा करण्यात आल्या, असा आरोप विरोधकांकडून होत असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर उत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, विरोधकांच्या या वावड्या आहेत. विरोधकांना पोटदुखी झालेली आहे. मी कालही म्हणालो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विरोधकांना पचलेली नाही. त्यांना हाजमोला द्यायला पाहीजे. माझ्या लाडक्या बहिणीचे हे सावत्र भाऊ आहेत. माझ्या बहिणींना पैसे मिळता कामा नयेत, ही योनजा सुरू होता कामा नये, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पण सरकार म्हणून आम्ही जेवढा पैसा लागेल तेवढा देऊ.
#Live | 🗓️27-07-2024 📍दिल्ली 🎥पत्रकारांशी संवाद https://t.co/l9wargbVvN
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 27, 2024
आम्ही कोणताही निर्णय घेतल्यानंतर मागे हटत नाहीत. आमच्याकडून ‘प्रिटिंग मिस्टेक’ झाली असे म्हणत नाही. चुनावी जुमला होता, असे म्हणत नाही. कारण आम्ही पूर्ण विचाराअंती निर्णय घेतला आहे. आमच्या सरकराने महिलांना एसटीमध्ये तिकीटात ५० टक्के सवलत केले, ज्येष्ठांना मोफत प्रवासाची मुभा दिली, तेव्हा निवडणुका नव्हत्या. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांनी एक गोष्ट ध्यान्यात घ्यावी की, त्यांच्याविरोधात कोण आहे, अशीही टीका एकनाथ शिंदे यांनी लगावली.




