Supreme Court Rejects Thackeray Group's Plea To Stop Election Commission From Deciding Eknath Shinde's Claim As Real Shiv Sena
महाराष्ट्र राजकारण

ब्रेकिंग! ठाकरे गटाला मोठा धक्का, निवडणूक आयोग ठरवणार खरी शिवसेना कोणती…

नवी दिल्ली : खरी शिवसेना कोणती हे ठरवण्यापासून निवडणूक आयोगाला रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. एकनाथ शिंदे गटाची खरी शिवसेना असल्याचा दावा निकाली काढण्यापासून निवडणूक आयोगाला रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. दिवसभर चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाच्या घटनापीठाने उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेला स्थगिती अर्ज फेटाळून लावला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

“भारतीय निवडणूक आयोगासमोरील कार्यवाहीला स्थगिती दिली जाणार नाही, असे आम्ही निर्देश देतो. त्यानुसार, इंटरलोक्युटरी अर्ज फेटाळला जातो”, असा आदेश खंडपीठाने दिला. केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील कार्यवाहीला स्थगिती नसेल, असं सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या पूर्णपीठाने सुनावणीअंती दिलेल्या आदेशात स्पष्ट केलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत