The unfortunate death of a sister-brother who went fishing in nagpur
अहिल्यानगर महाराष्ट्र

कौतुकास्पद! ताईबाईच्या मातृत्वाला जाग, नेसलेली साडी सोडून वाचवले दोघांचे प्राण

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीत बुडणाऱ्या दोन तरुणांचा ताईबाई नावाच्या एका महिलेने अंगावरील साडीच्या आधारे जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला आहे. जीव धोक्यात घालून दोन तरुणांना वाचवणाऱ्या ताईबाईंचं सर्वत्र कौतुक होत आहे. दारणा धरण क्षेत्रात झालेल्या संततधात पावसामुळे धरण ८०% टक्के भरले. त्यामुळे गोदावरी नदीपात्रात हळूहळू विसर्ग वाढवण्यात आला आणि गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. परिणामी नदीच्या काठावर असलेल्या विद्युत मोटारी सुरक्षित काढण्यासाठी शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोपरगाव तालुक्यातील कारवाडी हंडेवाडी येथील रहिवासी असलेले तरुण शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे, प्रदीप भीमाशंकर तांगतोडे, अमोल भीमाशंकर तांगतोडे हे तिघे भावंडे नदीतील सायपन आणि मोटारी काढण्यासाठी मंजूर येथील गोदावरी नदीच्या पात्रात उतरले. दुर्दैवाने पाणी वाढल्याने तीन्ही तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले. सुदैवाने जवळच शेळ्या चारण्यासाठी मंजूर येथील रहिवासी असलेल्या ताईबाई छबुराव पवार आणि छबुराव बाबुराव पवार यांनी सदर घटना पाहिली. शेवटी स्त्री ती स्त्रीच.

ताईबाई यांच्या मातृत्वाला जाग आली आणि त्यांनी कोणताही विचार न करता तरुणांना वाचवण्यासाठी आपल्या अंगावरील साडीच्या आधारे त्याना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. तर छबुराव पवार यांनी देखील मदत केली. ताईबाईंच्या प्रयत्नांना यश देखील आले. त्यातील दोघांना त्यांनी बाहेर काढले त्यात संतोष भीमाशंकर तांगतोडे (वय २५) हा तरुण वाढत्या प्रवाहात वाहून गेल्याने त्याचा मृतदेह शुक्रवारी काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे. ताईबाई यांच्या धाडसाचं कौतुक हे सर्व स्थरावर होत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत