The body of a person
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात महिलेने नवऱ्याची केली गळा आवळून हत्या, बहिणीच्या नवऱ्याची घेतली मदत

पुणे : पुण्यात घरगुती वादातून महिलेने आपल्या नवऱ्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. महिलेने बहिणीच्या पतीच्या मदतीने स्वतःचा पती कॅप्टन सिंग नायक (३७) यांची गळा आवळून हत्या केली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी त्यांची पत्नी अंजली कप्तानसिंग ​​नायक (३२) आणि गजेंद्र चित्तरसिंग नायक (३६) या दोघांनाही अटक केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गजेंद्र चित्तरसिंग नायक (३६) आणि अंजली कप्तानसिंग ​​नायक (३२, रा. गुरुकृपा सोसायटी, केशवनगर, मुंढवा) अशी अटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कप्तान सिंग त्याच्या पत्नीसह मुंढव्यातील केशवनगर येथील गुरुकृपा सोसायटीत राहत होता. कप्तान सिंग हा रोजंदारीवर काम करत होता. तो मूळचा दिल्लीचा असून त्याची पत्नी अंजली सोलापूरची आहे. कप्तान सिंगला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत तो नेहमी पत्नीला मारहाण करायचा. शनिवारी रात्रीदेखील दारूच्या नशेत येऊन त्याने पत्नीला मारहाण केली होती.

अंजलीने रविवारी दुपारी आपल्या बहिणीच्या नवऱ्याच्या मदतीने कॅप्टन सिंगला मारहाण करून त्याचा गळा आवळला. त्यानंतर त्याच्या घरमालकाला याबद्दल माहिती मिळताच त्यांनी कॅप्टन सिंगला रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालानुसार जबर मारहाण करून गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी तपासानंतर कारवाई करत दोनही आरोपींना अटक केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत