मुंबई : राज्यात सध्या चांगलीच थंडी जाणवत आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. पुढील ४८ तासांसाठी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आणि थंड दिवस राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राकडून याबाबत इशारा देण्यात आला आहे.
पुढील ४८ तासांसाठी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आणि थंड दिवस राहण्याचा इशारा दिला आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3ztCY भेट द्या— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) January 25, 2022
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २५ आणि २६ जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, बुलढाणा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आणि थंड दिवस राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.




