Suicide by hanging

उस्मानाबाद येथील ‘त्या’ पीडित महिलेच्या पतीचीही आत्महत्या

महाराष्ट्र

उस्मानाबाद : काही दिवसांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्याकडून वारंवार होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली होती. आता त्या महिलेच्या पतीने देखील एक व्हिडिओ शेअर करत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं, आणि नंतर औसा तालुक्यातील टाका या गावात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

व्हिडिओमध्ये म्हटलं आहे कि, “आत्महत्या करण्याचे कारण की हरिभाऊ कोळेकर यांनी माझा हसता खेळता परिवार उध्वस्त केला आहे. माझ्या पत्नीला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर माझ्या पत्नीने आत्महत्या केली. हरिभाऊ कोळेकर म्हणतो की माझे खूप दूर पर्यंत संबंध आहेत मी या प्रकरणातून सहज बाहेर पडेन. त्याला फाशी झालीच पाहिजे.” त्यांनी पुढे म्हटले कि, “माझ्या मृत्यूचे खरे कारण सासरकडील मंडळी देखील आहे. पूर्वी ते मला जावई देव माणूस आहे म्हणायचे. मात्र, पत्नीने आत्महत्या केल्यानंतर त्यांनी मला अनेकदा शिवीगाळ देखील केली आहे.

या महिलेने आपल्या राहत्या घराशेजारील इमारतीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात पोलिसाने बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याचे म्हटले होते. त्यामुळे पोलिसाच्या जाचाला कंटाळून या महिलेने हे पाऊल उचलले. दरम्यान, महिलेने लिहिलेल्या सुसाईड नोट वरून हरिभाऊ कोळेकर या पोलीस कर्मचाऱ्यावर उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३७६ (बलात्कार) ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) भा.द.वि नुसार गुन्हा दाखल करून या पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत