मुंबई : मुंबई-पुण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाचे कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहेत. या महापालिकांसाठी मतदान 15 जानेवारी रोजी होणार असून निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे. यासाठी आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील 29 महापालिकांमध्ये एकूण 3 कोटी 48 लाख मतदार मतदान […]
टॅग: OBC Reservation
विरोधक लाडक्या बहिणीचे सावत्र भाऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकवर टीका; म्हणाले, तेव्हा निवडणुका होत्या का?
मुंबई : महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना जाहीर केली असली तरी राज्याकडे पैसे नाहीत. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या घोषणा करण्यात आल्या, असा आरोप विरोधकांकडून होत असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, विरोधकांच्या या वावड्या आहेत. विरोधकांना पोटदुखी झालेली आहे. मी कालही […]
OBC आरक्षणासाठी नाना पटोलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
मुंबई : ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रातील सर्व ओबीसींना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करणारे पत्र नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. ओबीसी समाजावर राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात अन्याय होत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात बहुजनांवर अन्याय होणे योग्य नाही, असे या पत्रात […]
सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाच्या अंतरिम अहवालात राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता
मुंबई : इतर मागासवर्गीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अहवालामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झालेली आहे. विविध माध्यमे व इतरत्र सुरु असलेल्या उलट-सुलट चर्चांमुळे आयोगाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सचिव डी. डी. देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाला आता समर्पित […]
सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं, पंकजा मुंडे यांचा राज्य सरकारवर घणाघात
पुणे : ओबीसी आरक्षणावरून राज्यात वातावरण तापले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. त्या म्हणाल्या की या सरकारला मला सांगायचंय, चुकून तुम्ही राज्यात सत्तेवर आलात, भविष्यात जनता तुम्हाला दारात देखील उभं करणार नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं. सरकारने 15 महिने फक्त गोल गोल फिरवलं, कुठलाही डेटा कोर्टात जमा केला […]
देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या ताब्यात, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं
नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चक्काजाम आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात 1 हजार ठिकाणी भाजपकडून आज (26 जून) जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. त्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत […]
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणारं अतिरिक्त आरक्षण रद्द, राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवण्याचा निर्णय सुनावला आहे. त्याबाबत महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणारं अतिरिक्त राजकीय आरक्षण संपुष्टात आलं आहे. याअगोदर, महाराष्ट्र सरकारच्या जिल्हा परिषद कायद्याचा कलम १२ […]
दिलासादायक : ओबीसी क्रिमी लेअरसाठी उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन
नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणामध्ये क्रिमी लेअरसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही अधिकृत माहिती दिली आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाशी सल्लामसलत केल्यानंतर याबाबतचा विचार सुरु असल्याचे त्यांनी या उत्तरात म्हटले आहे. सध्या ओबीसीसाठी क्रिमी लेअरसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाख […]
ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर… देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला इशारा
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवं. त्याबाबत दुमत नाही. पण, ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला. आज भाजपच्या ओबीसी कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हा इशारा देतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही […]








