OBC creamy layer

दिलासादायक : ओबीसी क्रिमी लेअरसाठी उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन

देश

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणामध्ये क्रिमी लेअरसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही अधिकृत माहिती दिली आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाशी सल्लामसलत केल्यानंतर याबाबतचा विचार सुरु असल्याचे त्यांनी या उत्तरात म्हटले आहे.

सध्या ओबीसीसाठी क्रिमी लेअरसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाख आहे. “ओबीसीमध्ये क्रिमी लेअर निश्चित करण्यासाठी उत्पन्नाच्या निकषात बदल करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे,” असं कृष्णपाल गुर्जर म्हणाले म्हणाले.

2013 मध्ये क्रिमी लेअरसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा साडेचार लाखांवरुन 6 लाख करण्यात आली होती. तर 2017 मध्ये मोदी सरकारने ही मर्यादा सहा लाखांवरुन आठ लाख केली. आता वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु ही मागणी मान्य होण्याबाबत शंका आहे. परंतु क्रिमी लेअरसाठी उत्पन्नाची वार्षिक मर्यादा आठ लाखांवरुन 12 लाखांपर्यंत होऊ शकते. मात्र यासंदर्भातील अधिकृत निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून होऊ शकतो.

दरम्यान एससी आणि एसटीसाठी क्रिमी लेअरची कोणतीही मर्यादा नाही. जेव्हापासून ओबीसी आरक्षण लागू झालं, तेव्हापासून क्रिमीलेअरची मर्यादा घालून देण्यात आली आहे. उत्पन्नाची मर्यादा वाढवून अधिकाधिक लोकांना लाभ मिळावा, असा उद्देश सरकारचा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत