Chief Minister
महाराष्ट्र मुंबई राजकारण

विरोधक लाडक्या बहिणीचे सावत्र भाऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकवर टीका; म्हणाले, तेव्हा निवडणुका होत्या का?

मुंबई : महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना जाहीर केली असली तरी राज्याकडे पैसे नाहीत. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या घोषणा करण्यात आल्या, असा आरोप विरोधकांकडून होत असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, विरोधकांच्या या वावड्या आहेत. विरोधकांना पोटदुखी झालेली आहे. मी कालही […]

Eknath Shinde
महाराष्ट्र सोलापूर

पंढरपुरात राजकीय नेत्यांचे नव्हे, तर वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबई : पंढरपुरात विविध राजकीय नेत्यांच्या स्वागताचे फलक आणि बॅनर्स लावण्यापेक्षा विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथे जाऊन आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांसाठी केलेल्या व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा काल घेतला. तसेच वारकऱ्यांची संवादही साधला. यावेळी त्यांच्या लक्षात आले की पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर विविध पक्षांनी […]

Shiv Sena leader Sanjay Raut gets bail in Patra Chawl land scam
महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! अखेर शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर… पण ईडी उच्च न्यायालयात जाणार

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला आहे. गेल्या सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने संजय राऊतांच्या जामीन अर्जावरी आपला निर्णय राखून ठेवला होता. यावरच आज सुनावणी झाली असून अखेर 100 दिवसांनंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. राऊत यांना जामीन मिळाल्यामुळे […]

CM Eknath Shinde Stops His Convoy At Highway, Helps Man Whose Car Caught Fire
महाराष्ट्र मुंबई

‘गाडीपेक्षा जीव महत्वाचा!’ कारला अचानक लागली आग, मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवत कारमालकाला प्रेमळपणे समजावले…

मुंबई : मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विलेपार्ले परिसरात मंगळवार 13 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ज्याच्या कारला आग लागली त्या व्यक्तीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दयाळूपणे मदत केली. एका कारला अचानक आग लागल्याची घटना सोमवारी रात्री घडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या ताफ्यासह प्रवास करत असताना ही दुःखद घटना पाहून त्यांनी ताफ्याला थांबण्याचे आदेश दिले. मुंबईतील […]

cm eknath shinde devendra fadnavis
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मंत्रिमंडळ निर्णय, १६ जुलै : औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरताबाबत सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती!

मुबई : उद्धव ठाकरे सरकारने अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी घेतलेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यासोबतच नवी मुंबई विमानतळाला देखील दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. मात्र, हे निर्णय नवीन सराकर फिरवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर आज […]

Give immediate treatment to those affected by contaminated water - Chief Minister Eknath Shinde's instructions to the administration
अमरावती महाराष्ट्र

दूषित पाणी पिल्याने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील पाचडोंगरी आणि कोयलारी गावातील विहिरींचे दूषित पाणी पिल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाचडोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी प्यायल्यामुळे 50 जणांना अतिसाराची लागण झाली. या दुर्घटनेत तीन नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती […]

Invitation to Chief Minister Eknath Shinde for Ashadi Maha Puja
महाराष्ट्र

आषाढीला विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करणार, निवडणूक आयोगाची परवानगी

पंढरपूर : आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा ही एकनाथ शिंदेंच्या हस्तेच होणार हे निश्चित झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्याला निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडणार आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. मात्र, राज्यात नगरपालिका निवडणूक […]