Invitation to Chief Minister Eknath Shinde for Ashadi Maha Puja
महाराष्ट्र

आषाढीला विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करणार, निवडणूक आयोगाची परवानगी

पंढरपूर : आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा ही एकनाथ शिंदेंच्या हस्तेच होणार हे निश्चित झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्याला निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. मात्र, राज्यात नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली असून मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. त्या विनंतीला निवडणूक आयोगाने तीन अटींसह परवानगी दिली आहे. विश्रामगृह येथे पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी याचा समारोप सोहळा होणार आहे. एकादशीच्या दिवशी पहाटे शासकीय महापूजा झाल्यावर पहाटे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. तसंच सकाळी ११ वाजता सुंदर माझे कार्यालय, स्वच्छता दिंडी समारोप आणि दुपारी मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेना पक्षाच्या मेळाव्यास हजेरी लावणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांना ‘या’ अटींसह परवानगी

  1. पूर्वनियोजित शासकीय कार्यक्रमांमध्ये कोणत्याही निधी विकास योजना, कार्यक्रमांची घोषणा करू नये.
  2. वरील सर्व कार्यक्रमांसाठी आवश्यक त्या नियमानुसार परवानग्या घेण्यात याव्यात.
  3. कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यास हरकत नाही, पण त्या ठिकाणीही उपरोक्त अटींचे पालन करण्यात यावे.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत