मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला आहे. गेल्या सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने संजय राऊतांच्या जामीन अर्जावरी आपला निर्णय राखून ठेवला होता. यावरच आज सुनावणी झाली असून अखेर 100 दिवसांनंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. राऊत यांना जामीन मिळाल्यामुळे ठाकरे गटाने एकच जल्लोष केला आहे.
दरम्यान आज संध्याकाळपर्यंत ते बाहेर येण्याची शक्यता आहे. विशेष पीएमपीएल कोर्टाकडून खासदार संजय राऊत यांना जमीन मंजूर केला आहे. राऊत यांचा जामीन रद्द करण्यात यावा या मागणीसाठी ईडी उच्च न्यायालयात जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
गेल्या २००६ मध्ये जॉईंट व्हेंचरअंतर्गत गुरू आशिष बिल्डरने पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. २००८ मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली. पण, दहा वर्षानंतरही पुनर्विकास झाला नसल्याचे लक्षात आले. मूळ ६७८ रहिवाशांना वाऱ्यावर सोडून म्हाडाच्या घरांना देखील बिल्डरने चुना लावल्याची माहिती होती. या बिल्डरने म्हाडाला १ हजार ३४ कोटींचा चुना लावला होता. बिल्डरने विक्रीसाठी असलेले क्षेत्र सात त्रयस्थ विकाससकांना विकल्याचा आरोप या बिल्डरवर होता. ही गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचे संचालक राकेश वाधवान आहे.
राऊत अटक आणि जामीन, कधी काय?
- संजय राऊतांना ईडीकडून 31 जुलैला अटक
- सुरुवातीला राऊतांची ईडी कोठडीत रवानगी
- 8 ऑगस्टला पीएमएलए कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली
- संजय राऊतांची आर्थर रोड कारागृहात रवानगी
- 7 सप्टेंबरला पीएमएलए कोर्टात जामिनासाठी अर्ज
- राऊतांच्या जामीन अर्जावर 2 नोव्हेंबरला सुनावणी
- 2 नोव्हेंबरला न्यायालयाने निकाल राखून ठेवला
- ११ नोव्हेंबरला जमीन मंजूर
संजय राऊत यांना जामीन मिळावा म्हणून अनिल देशमुख प्रकरणाचा दाखला देण्यात आला. देशमुख यांना ज्या पद्धतीने जामीन देण्यात आला. त्याच धर्तीवर राऊतांना जामीन देण्याची मागणी करण्यात आली. कोर्टाने ही मागणी मंजूर करत त्यांना 2 लाखाच्या जात मुचलक्यावर सोडण्याचे निर्देश दिले.




