मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वाद निर्माण झाला आहे. जोशींच्या या विधानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, भैय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं असं जाहीर आव्हानचं त्यांनी दिलं […]
टॅग: BJP
एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का, ‘ती’ १२९ कोटी रुपयांची निविदाही रद्द, चर्चांना उधाण
सोलापूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाल्यानंतर विरोधकांना मोठा धक्का बसला होता. मात्र, आता सत्ताधारी पक्षांतील अंतर्गत वाद समोर येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या बैठकींमध्ये उपमुख्यमंत्री बहुतेक वेळा गैरहजर राहत असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना घेतलेले अनेक निर्णय बदलले जात आहेत. शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना काढलेल्या काही […]
उद्धव ठाकरे शिंदेंना मुख्यमंत्री करणार होते, पण शरद पवारांनी अडथळा घातला; संजय राऊतांचा धक्कादायक खुलासा
मुंबई: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि शिवसेनेतील फूट, यावर नवीन वाद उभा राहिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं, ज्यात त्यांनी स्पष्ट केलं की, “जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते, तर शिवसेना फुटली नसती. आम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव केला.” त्यांच्या या आरोपावर प्रतिक्रिया देताना, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक खळबळजनक […]
धनंजय मुंडे-धस भेटीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुरेश धस यांच्या पाठिशी ठाम समर्थन, संजय राऊत यांच्यावर टीका: मुर्खांना मी उत्तर देत नाही
राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्या भेटीवर चर्चा रंगली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवणारे आमदार सुरेश धस हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे विरोधकांच्या लक्ष्यावर आले आहेत. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावातून प्रतिक्रिया देत विरोधकांना टोला लगावला. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, “संतोष देशमुख यांच्या […]
राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत, काहीही बरळतात; भाजपच्या बड्या मंत्र्याची जिव्हारी लागणारी टीका
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका करतांना म्हटलं, “फक्त दोन तासांसाठी ईडी आणि सीबीआय आमच्या हातात द्या, अमित शाहसुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील.” ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, ज्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं दिसून आलं. यावर संजय […]
मंत्रिमंडळ विस्तार: नव्या मंत्र्यांचा शपथविधी, ‘या’ दिग्गज नेत्यांचा पत्ता कट
नागपूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर ५ डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला होता. मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आणि नागपूरमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजपच्या १९ मंत्र्यांनी, शिवसेना शिंदे गटाच्या ११ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत […]
लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवर तृणमूल काँग्रेसचा आक्षेप, एकाने जरी मतविभाजनाची मागणी केली तरी मतविभाजन करावं लागतं, हाच नियम आहे – तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी
दिल्ली : लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे के. सुरेश हेसुद्धा या पदाच्या शर्यतीत होते. परंतु, आवाजी मतदानात ओम बिर्ला यांची निवड झाली. दरम्यान, या निवडणुकीवर तृणमूल काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. सभागृहाबाहेर येऊन तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधून भाजपावर टीका केली आहे. अभिषेक बॅनर्जी म्हणाले, नियमानुसार […]
आमदार अपात्रतेच्या निर्णयासाठी कोणते निकष लावणार? राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली प्रक्रिया
मुबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालानंतर सगळ्यांचं लक्ष राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे लागलं आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात अंतिम निकाल विधानसभा अध्यक्ष घेतील, असं न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर त्यावरून मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. खुद्द राहुल नार्वेकर निकाल आला तेव्हा लंडनमध्ये होते. आता ते परत आल्यानंतर नेमकी ही निर्णय प्रक्रिया कशी आणि […]
मोठी बातमी! अखेर शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर… पण ईडी उच्च न्यायालयात जाणार
मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला आहे. गेल्या सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने संजय राऊतांच्या जामीन अर्जावरी आपला निर्णय राखून ठेवला होता. यावरच आज सुनावणी झाली असून अखेर 100 दिवसांनंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. राऊत यांना जामीन मिळाल्यामुळे […]
राज ठाकरेंच्या पत्राचा गांभीर्यानं विचार करु, पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ – देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज ठाकरे यांच्या पत्राचा गांभीर्यानं विचार करु, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी आवाहन करणारं पत्र लिहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेनं आम्हाला पाठिंबा द्यावा, यासाठी आज आशिष शेलार राज ठाकरे यांची भेट घेऊन […]