मुंबई : महाराष्ट्रातील वाशिम येथील सत्र न्यायालयाने मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत (एससी/एसटी कायदा) आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राच्या सत्यतेबाबत आरोप केल्याप्रकरणी पोलिस तपासाचे निर्देश दिले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच.एम. देशपांडे यांनी सांगितले की, तक्रारीतील आरोप आणि रेकॉर्डवरील कागदपत्रे यावरून दखलपात्र गुन्हा उघड झाला […]
टॅग: nawab malik
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना धक्का, सर्वोच्च न्यायालयाचा मतदान करण्यास नकार
मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता आले नाही. सध्याच्या तरतुदीनुसार तुरुंगातील व्यक्ती मतदान करू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. लोकप्रतिनिधींना सूट देण्यासाठी याचिकेत उपस्थित केलेल्या कायदेशीर मुद्द्यांचा नंतर विचार केला जाईल. विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्याची त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर […]
नवाब मलिकांचे डी-गँगशी संबंध, कारवाई पुढे चालू ठेवण्याचे न्यायालयाचे निर्देश
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. विशेष न्यायालयाने मलिकांविरुद्धच्या खटल्यावर सुनावणी करताना ईडीने सादर केलेल्या दोषारोपपत्राची दखल घेतली. नवाब मलिक हे जाणूनबुजून आणि थेट मनी लाँड्रिंगमध्ये सहभागी असल्याचं निरीक्षण यावेळी न्यायालयाने नोंदवलं. दोषारोपपत्राची दखल घेत विशेष न्यायालयाने नवाब मलिक यांच्याविरुद्धची कारवाई पुढे चालू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. नवाब […]
मोठी बातमी! नवाब मलिक यांना मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली याचिका
नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणातील न्यायालयीन कोठडीतून सुटकेची मागणी करणारी महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली, ज्याची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मार्फत चौकशी केली जात आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालय या टप्प्यावर हस्तक्षेप करू शकत नाही. न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, “तुम्ही योग्य न्यायालयात जामीनासाठी अर्ज […]
नवाब मलिकांना मोठा झटका! ईडीच्या कारवाईविरोधात केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात ईडीच्या कारवाईविरोधात केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ईडीने केलेली अटक कारवाई आणि त्यानंतर विशेष पीएमएलए कोर्टाने सुनावलेला कोठडी आदेश बेकायदा असल्याचा दावा करत दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेतील अंतरिम सुटकेचा विनंती अर्ज न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे व न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने फेटाळला आहे. […]
नवाब मलिकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, विशेष न्यायालयाकडून ईडीची मागणी मान्य
मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना विशेष न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीत होते. मात्र, आजच्या सुनावणीदरम्यान ईडीने नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यास हरकत […]
वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांची मुंबई हायकोर्टात बिनशर्त माफी, दिली ‘ही’ हमी
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे प्रकरणात मुंबई हायकोर्टात हमी देणारे प्रतिज्ञापत्र सादर केले. गेल्या सुनावणीत कोणतेही वक्तव्य करणार नसल्याची लेखी हमी देऊनही त्याचे हेतुत: उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्यावर अवमान कारवाई का केली जाऊ नये अशी विचारणा करत न्यायालयाने नवाब मलिक यांना खडसावलं होतं. या वेळी त्यांनी कोर्टात खेद व्यक्त […]
युवक-युवतींना प्रशिक्षणाबरोबरच शाश्वत रोजगाराची संधी – नवाब मलिक
मुंबई : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांना आता पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी आज राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलुंड येथील शासकीय आयटीआय आणि पंचतारांकित हॉटेलांची श्रृंखला असलेल्या आयटीसी हॉटेल लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. याअंतर्गत मुलुंड आयटीआयमध्ये फूड अँड बेव्हरेजेस (अन्न आणि पेयपदार्थ) […]
बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार
मुंबई : बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने पुढाकार घेतला असून यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे मंडळाकडील एकूण ८ शैक्षणिक वर्षातील सुमारे १० लाख डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे जारी करण्यात येत आहेत. यामुळे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांना पायबंद घातला जाणार असून उद्योगांना उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणी करणे सुलभ होणार आहे. शिवाय यामुळे योग्य उमेदवारांचीही होणारी […]
देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाच्या विरोधात, नवाब मालिकांचे भाजप आणि फडणवीसांवर गंभीर आरोप
मुंबई : भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आरक्षण कायद्याच्या विरोधात आहेत, भाजपचे देवेंद्र फडणवीस सपशेल खोटं बोलत आहेत. ते या मुद्द्यावर राजकारण आणि दिशाभूल करत आहेत.’ असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी नवाब मलिक बोलत […]





