Sharad Pawar
महाराष्ट्र मुंबई

शरद पवार यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात असून त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यांसदर्भात माहिती दिली आहे. शरद पवार यांना बुधवारी पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांची नियमित तपासणी झाली होती. त्यानंतर आज त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता […]

Sharad Pawar admitted to Breach Candy Hospital
महाराष्ट्र मुंबई

शरद पवार पुन्हा एकदा ब्रीच कँण्डी रुग्णालयात दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा ब्रीच कँण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. शरद पवार यांना काल रात्री ब्रीच कँण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मागील महिन्यात त्यांच्यावर एन्डोस्कोपी करुन त्यांच्या पित्तनलिकेतील खडा काढण्यात आला होता. त्यानंतर काही दिवस विश्रांती […]

NCP chief Sharad Pawar endoscopy surgery completed
महाराष्ट्र मुंबई राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, २-3 दिवसांत रुग्णालयातून घरी सोडणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही. मात्र, शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरवरही आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. ही शस्त्रक्रिया नक्की कधी करायची, याचा […]

devendra fadnavis press conference
नागपूर महाराष्ट्र राजकारण

सचिन वाझेंचे सर्व मालक चिंतेत की तो NIA ला काय सांगेल : देवेंद्र फडणवीस

नागपूर :  सचिन वाझेंचे सर्व मालक याच चिंतेत आहेत की सचिन वाझें NIA ला काय सांगेल, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हल्लाबोल केला आहे. नवाब मलिक का बरं चिंतेत आहेत? कारण फोन टॅपिंग रिपोर्टमध्ये अनेक लोकांचे बिंग फुटेल. काँग्रेससह हे तिन्ही पक्ष अस्वस्थ आहेत. कारण वाझेंचे हे खरे मालक आहेत. यांनी वाझेंकडून काय काय […]

Chandrakant Patil
कोल्हापूर महाराष्ट्र राजकारण

चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातून उभे राहावेच; आम्ही डिपॉझिट जप्त करुन दाखवू – नवाब मलिक

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरमधून निवडणूक लढवूनच दाखवावी. आम्ही त्यांचे डिपॉझिट जप्त करून दाखवू, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला. चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी कोथरुड येथील कार्यक्रमात विरोधकांवर टीकास्त्र सोडले होते. मी कोल्हापूर सोडून कोथरुडमधून निवडणूक लढलो म्हणून मी पळून आलो, असे विरोधक म्हणतात. माझी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढण्याची […]