मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा ब्रीच कँण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
शरद पवार यांना काल रात्री ब्रीच कँण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मागील महिन्यात त्यांच्यावर एन्डोस्कोपी करुन त्यांच्या पित्तनलिकेतील खडा काढण्यात आला होता. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ११ एप्रिल रोजी पुन्हा त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. १२ एप्रिल रोजी त्यांच्या पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवसांनंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. मात्र, काल पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Update
Our party President Sharad Pawar saheb was admitted at Breach Candy Hospital in Mumbai last evening for a follow up procedure post his Gall Bladder surgery.
The procedure has been conducted and he is now recuperating in the hospital.— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 21, 2021
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करत पवारांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काल संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर गॉलब्लॅडर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती सुधारत आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.




