रांची : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. धोनीचे वडील पान सिंह धोनी आणि आई देवकी देवी या दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोघांना उपचारासाठी झारखंडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
धोनीच्या आई-वडिलांना रांचीमधील बरियातू रोड येथील पल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती सामान्य असल्याची माहिती मिळाली आहे. पल्स रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, धोनीच्या आई-वडिलांची ऑक्सिजन लेव्हलही प्रमाणात असून सुदैवाने कोरोना दोघांच्याही फुफ्फुसांपर्यंत पोहोचलेला नाही. दोघांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल.




