george floyds death

‘त्या’ हत्या प्रकरणात पोलिस दोषी, उर्वरित आयुष्य तुरुंगातच काढावं लागणार….

क्राईम ग्लोबल

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या न्यायालयाने मिनियापोलिसातील माजी पोलिस अधिकारी डेरेक शॉविनला जॉर्ज फ्लॉइड हत्या प्रकरणी दोषी ठरवलं आहे. वॉशिंग्टनच्या हेनेपिन काउंटी न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायाधिशांनी डेरेकला निर्घृण हत्या प्रकरणात दोषी ठरवले असून त्याला लवकरच शिक्षा सुनावली जाऊ शकते. शॉविन विरोधात सेकेंड डिग्री मर्डर, थर्ड-डिग्री मर्डर आणि मैनस्लॉटर असे तीन आरोप होते. यात त्याला सेकंड डिग्री मर्डरसाठी 40 वर्षांची कैद, थर्ड डिग्री मर्डर प्रकरणात 25 वर्षांची कैद तर मॅनस्लॉटर प्रकरणी दहा वर्षांची कैद किंवा 20 हजार डॉलर्सचा दंडाची तरतूद आहे. जॉर्ज फ्लॉइड हत्या प्रकरणी दोषी ठरलेल्या डेरेकला शॉविनला उर्वरित आयुष्य तुरुंगातच काढावं लागेल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जॉर्ज फ्लॉइ़ड हत्या प्रकरणी डेरेकला शिक्षा सुनावल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यांनी म्हटलं की, न्यायालयाच्या निर्णयाने जॉर्ज परत नाही येऊ शकत. पण आम्हाला माहिती झालं की आपण पुढे काय करू शकतो. मी श्वास घेऊ शकत नाही हे त्याचे शेवटचे शब्द होते. आम्ही हे शब्द मरु देणार नाही. आपल्याला ते ऐकावे लागतील आणि त्यापासून दूर पळू शकत नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत