Man jumped from Narmada bridge with two children, when there was a quarrel with wife
क्राईम देश

वडिलांनी दोन मुलांसह मारली नदीत उडी, दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू… धक्कादायक कारण आले समोर

मध्य प्रदेश : पत्नीशी झालेल्या वादातून वैतागलेल्या व्यक्तीने नर्मदा पुलावरून दोन मुलांसह उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास या व्यक्तीने 2 वर्षांचा मुलगा आणि 4 वर्षाच्या मुलीसह मध्य प्रदेशातील नर्मदापुरम-बुडनी दरम्यानच्या पुलावरून नदीत उडी मारली. गोताखोरांनी वडिलांना तर वाचवले, मात्र या घटनेत दोन्ही निष्पाप चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरोपी वडिलांविरुद्ध मुलांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, सोहागपूरमधील गुदराई येथे राहणाऱ्या राजेश अहिरवार याने ३ दिवसांपूर्वी पत्नीवर प्राणघातक हल्ला केला होता, त्यामुळे पत्नीच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर राजेशने पत्नीला उपचारासाठी नर्मदापुरम येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास या पती-पत्नींमध्ये हॉस्पिटलमध्ये कशावरून तरी वाद झाला, त्यानंतर राजेश दोन्ही मुलांना सोबत घेऊन गेला आणि दोन्ही मुलांसह नर्मदा पुलावरून उडी मारली. यावेळी राजेशला एका प्रवाशाने पुलावरून उडी मारताना पाहिले आणि त्याने १०० क्रमांकावर तक्रार नोंदवली.

काकाकडून तरुणीवर वारंवार बलात्कार, अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून केले ब्लॅकमेल…

घटनेची माहिती मिळताच बुडणी पोलिस ठाण्याचे टीआय विकास पुल्ली यांनी गोताखोरांसह घटनास्थळी धाव घेतली. गोताखोरांनी सुमारे 1 किमी अंतरावरून वडिलांची सुटका केली. मुलांचा शोध घेण्यासाठी रात्रभर बचावकार्य सुरू होते, मात्र त्यांना वाचवता आले नाही. शनिवारी सकाळी ट्रायडंट कंपनीच्या इंटॉकवेलजवळ 2 वर्षांचा मुलगा सार्थक आणि 4 वर्षांची मुलगी ओमवती यांचे मृतदेह आढळून आले. याप्रकरणी वडिलांवर मुलांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक! 5 रुपयांच्या लिंबासाठी ग्राहकाने दिली 100 रुपयांची नोट, दुकानदाराने उचलले टोकाचे पाऊल…

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत