Rise in the price of domestic gas cylinders once again
अर्थकारण देश

गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले…

नवी दिल्ली : महागाईने गुरुवारी सकाळी सर्वसामान्यांना आणखी एक झटका दिला. या महिन्यात दुसऱ्यांचा एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. घरगुती सिलेंडरसह व्यावसायिक सिलेंडरच्या किमती देखील वाढल्या आहेत. १४ किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत ३.५० रुपयांनी वाढ झाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आजपासून दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरची किमत १ हजार ३, मुंबईत १ हजार २ रुपये ५० पैसे, कोलकातामध्ये १ हजार २९ रुपये, तर चेन्नईत १ हजार १८ रुपये ५० पैसे इतकी झाली आहे. या महिन्यात घरगुती सिलेंडरची किमत वाढण्याची ही दुसरी वेळ आहे. याआदी ७ मे रोजी सिलेंडरची किमत ५० रुपयांनी वाढवण्यात आली होती.

घरगुती सिलेंडर सोबत १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडर देखील महाग झाला आहे. त्याच्या किमतीत ८ रुपयांनी वाढ करण्यात आली असून यामुळे दिल्लीत त्याची किमत २ हजार ३५४, मुंबईत २ हजार ३०६, कोलकातामध्ये २ हजार ४५४ आणि चेन्नईत २ हजार ५०७ रुपये इतकी झाली आहे. आजच्या किमत वाढीमुळे संपूर्ण देशात १४.२ किलोचा घरगुती सिलेंडरची किमत १ हजारच्या पुढे गेली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत