sbi
अर्थकारण काम-धंदा देश

महत्वाची बातमी : SBI बँकेत खाते असल्यास त्वरित पूर्ण करा महत्वाचे व्यवहार, अन्यथा…

भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये जर तुमचे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आपल्याला जर एखादा महत्वाचा व्यवहार करायचा असेल, तर तो त्वरित पूर्ण करा, कारण देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ची डिजिटल बँकिंग सेवा आज रात्री काही तास उपलब्ध असणार नाही. यावेळी आपण एसबीआयच्या इंटरनेट बॅकिंग सेवा, योनो, योनो लाइट आणि यूपीआय या सेवांचा लाभ घेऊ शकणार नाही. SBI ने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे माहिती दिली आहे कि, “ग्राहकांना अखंडित बँकिंगचा अनुभव देण्यासाठी आणि सुविधा सुधारण्यासाठी, २१ मे रोजी रात्री १०.45 ते २२ मे रोजी रात्री १. 15 पर्यंत बँकिंग सुविधा उपलब्ध असणार नाहीत. त्यानंतर 23 मे रोजी रात्री 2.40 ते 6.10 या वेळेत देखभाल दुरुस्तीचे काम केले जाईल, त्यामुळे बँकिंग सुविधा उपलब्ध असणार नाहीत.

कोरोना संसर्गाचा वाढत धोका लक्षात घेता भारतीय बँक असोसिएशन (IBA) या बँकांच्या सर्वोच्च संस्थेने केवळ सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बँक उघडण्याचा सल्ला दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने हा नियम लागू केला आहे. SBI बँकेची शाखा आता सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सेवा देतील.

SBI शाखांमध्ये ग्राहकांना चार प्राथमिक सेवा दिल्या जातील :

  1. रोख रक्कम काढणे किंवा रोख रक्कम जमा करणे
  2. चेक सुविधा
  3. ड्राफ्ट, आरटीजीएस आणि एनईएफटी
  4. शासकीय चालान संबंधित कामे

मोठी बातमी : करदात्यांना मोठा दिलासा, CBDT ने वाढवून दिली प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत

Cyclone Tauktae : पी -305 जहाज बुडाल्याप्रकरणी कॅप्टनसह अनेक जणांविरोधात गुन्हा दाखल

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत