The father killed his two children with an axe
क्राईम देश

भयंकर : पित्यानेच कुऱ्हाडीने वार करून केली दोन मुलांची हत्या, आणि…

पाटणा : बिहारची राजधानी पाटणाला लागून असलेल्या मोकामा येथे एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. ही घटना नगर पोलीस स्टेशन परिसरातील कन्हाईपुर गावातील आहे. येथील एका विक्षिप्त वडिलांनी गुरुवारी रात्री उशिरा आपल्या दोन मुलांचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. चंदन महतो असे या आरोपीचे नाव आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

चंदन महतो याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यावरून त्याने दोन दिवसांपूर्वी पत्नीला मारहाण केली होती आणि रागाच्या भरात तिला घराबाहेर काढले होते. अशा परिस्थितीत त्यांची दोन्ही मुलं अंकित आणि अलिशा घरी आरोपीसोबत एकटे राहत होते. याचाच फायदा घेत त्याने दोन्ही मुलांची निर्घृण हत्या केली. तसेच, हत्या केल्यानंतर त्याने मोकामा पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.

ब्रेकिंग : तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची 8 वर्षानंतर बलात्कार प्रकरणात निर्दोष मुक्तता

सर्व घटनेची मिळाल्यानंतर मोकामा पोलिस तात्काळ आरोपीच्या घरी पोहोचले. तेथे दोन्ही मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठविले. सध्या पोलिसांनी दुहेरी हत्येचा तपास सुरू केला आहे.

दरम्यान, चंदन महतोचा शेजारी सुरेंद्र महतो याने माहिती दिली कि, “चंदन महतोने आपल्या दोन्ही मुलांना कुऱ्हाडीने मारले. त्यांच्यात अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. या प्रकरणात पंचायत देखील घेण्यात आली होती. तसेच त्याने पत्नीला मारहाण करून घराबाहेर काढलं होतं, त्यानंतर ती तिच्या माहेरी आहे. त्यातच त्याने काल रात्री मुलांचीही हत्या केली. आरोपीला असा संशय होता की त्याच्या पत्नीचे दुसर्‍या पुरुषाशी अनैतिक संबंध आहेत.”

गायक केव्हिनच्या मृत्यूप्रकरणात धक्कादायक खुलासा, गॅलरीत मॉडेलबरोबर करत होता रोमान्स तेवढ्यात…

Cyclone Tauktae : पी -305 जहाज बुडाल्याप्रकरणी कॅप्टनसह अनेक जणांविरोधात गुन्हा दाखल

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत