juhi chawla 5g technology case suit dismissed Rs 20 lakh fine
देश

पब्लिसिटी स्टंट! जुही चावलाची 5G विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली, 20 लाखांचा दंड

नवी दिल्ली : जुही चावलाने भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही 5G विरोधातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ही याचिका पब्लिसिटीसाठी असल्याचं सांगत जुही चावलाला कोर्टानं 20 लाखांचा दंड ठोठावला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जूही चावला हिने 5G वायरलेस तंत्रज्ञानामुळे मानवांवर गंभीर आणि अपरिवर्तनीय परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच, त्यामुळे पृथ्वीवरील सर्व परिसंस्थांना कायमची हानी पोहोचण्याचा धोका आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने जूही चावला हिची याचिका फेटाळताना म्हटले की याचिकाकर्त्याने कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर केला आहे आणि यामुळे जुही चावलाला २० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटले की हा खटला केवळ प्रसिद्धीसाठी दाखल करण्यात आला होता, असे दिसत आहे आणि म्हणूनच जुही चावला यांनी सुनावणीची लिंक देखील सोशल मीडियावर शेअर केली होती. तसेच या याचिकेतील थोडीशी माहिती योग्य असली तरी बाकीच्या फक्त शंका व्यक्त केल्या आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत