जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला आणि त्यांचा मुलगा उमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना काल पुलवामा येथे जाण्यास परवानगी दिली नव्हती.
ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत म्हटलं कि, “तुमचे लोकशाहीचे नवीन मॉडेल म्हणजे आम्हाला आमच्या घरात काहीही स्पष्टीकरण न देता बंदिस्त ठवण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे घरात काम करणाऱ्या कर्मचार्यांना येण्याची परवानगी दिली जात नाही. ऑगस्ट 2019 नंतर हे आहे नवीन जम्मू-काश्मीर. आम्ही काही स्पष्टीकरण न देता आमच्या घरात बंदिस्त आहोत. हे खूप वाईट आहे की त्यांनी माझ्या वडिलांना आणि मला आमच्या घरात लॉक केले आहे. माझ्या बहिणीला आणि तिच्या मुलांनाही त्यांच्या घरात लॉक केले आहे.”
Chalo, your new model of democracy means that we are kept in our homes without explanation but on top of that the staff that works in the house aren’t being allowed in and then you are surprised that I’m still angry & bitter.
— Omar Abdullah (@OmarAbdullah) February 14, 2021




