Anyone watching pornographic videos on the Internet will be alerted immediately

इंटरनेटवर अश्लील व्हिडिओ पाहणं महागात पडणार, अॅनालिटिक्स टीम ठेवणार ‘वॉच’

तंत्रज्ञान देश

नवी दिल्ली : इंटरनेटवर अश्लील व्हिडिओ पाहणं आता महागात पडू शकतं. मोबाइलवर कोण अश्लील व्हिडिओ पाहत आहे, यावर आता १०९० टीम वॉच ठेवणार आहे. अश्लिल फोटो आणि व्हिडिओ पाहणाऱ्यांना लगेच अलर्ट केलं जाणार आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी अलर्ट असलेली १०९० टीम वेळोवेळी जागृत करण्याचे मेसेज सोशल मीडियावर पाठवणार आहेत. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर हे मेसेज पाठवले जातील.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एडीजी नीरा रावत यांनी इंटरनेटवरील वाढत्या सर्च मोहीमेसंबंधी बोलताना ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, इंटरनेटचे अॅनालिटिक्स स्टडी करण्यासाठी एक कंपनी कार्यरत आहे. डेटाच्या माध्यमातून इंटरनेट वर काय सर्च केले जात आहे, यावर वॉच ठेवला जाणार आहे. जर एखादी व्यक्ती इंटरनेटवर अश्लील व्हिडिओ पाहत असेल तर त्याचे संकेत अॅनालिटिक्स टीमला मिळतील. ही टीम त्वरित त्याच्यासंबंधी १०९० टीमला कळवणार आहे. त्या व्यक्तीला अलर्ट करण्यासाठी एक मेजेस पाठवला जाईल. असे करून गुन्ह्याच्या सुरुवातीला रोखता येऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

१०९० ने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या माध्यमाचा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. उत्तर प्रदेश मध्ये डिजिटल चक्रव्यूहसाठी एक डिजिटल आउटरिच रोडमॅप तयार करण्यात आला आहे. ही महिला सुरक्षेसाठी ३६० डिग्री इकोसिस्टम असेल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत