Show cause notice to Kunal Kamra and Rachita Taneja

कुणाल कामरा आणि रचिता तनेजा यांना सर्वोच्च न्यायालयाने बजावली कारणे दाखवा नोटीस

देश

कॉमेडियन कुणाल कामरा आणि व्यंगचित्रकार रचिता तनेजा यांना सर्वोच्च न्यायालयाने कोर्टाचा अवमान केल्याची नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या नोटिशीला 6 आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कुणाल कामरा आणि रचिता तनेजा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या विरोधात अवमानकारक भाषा वापरली होती. कुणाल कामराने अर्णब गोस्वामींना जामीन दिल्यानंतर एक ट्विट केलं. त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. तर रचिता तनेजानं काढलेल्या व्यंगचित्रातून न्यायालयाचा अवमान झाल्याचं सांगत अवमान खटला चालवण्याची मागणी करण्यात आली होती. दोघांविरुद्ध अवमान खटला चालवण्यास अॅटर्नी जनरल के. वेणुगोपाल यांनी परवानगी दिली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

कुणाल कामरानं रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्यावर टीका करणार ट्विट केलं होतं. अर्णब गोस्वामीच्या जामीनाला विरोध करत कामराने सर्वोच्च न्यायालयावर टीका केली होती. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांविषयी वादग्रस्त ट्विट केलं होतं. तर रचिता तनेज यांनी काढलेल्या व्यंगचित्रावर आक्षेप घेण्यात आला होता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत