these foods can improve your lungs health
ग्लोबल देश

WHO चा धक्कादायक संशोधन अहवाल, जगातील 99% लोकांचा फुफ्फुसापर्यंत पोहोचतेय स्लो पॉइझन

WHO Report : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एक धक्कादायक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की जगातील 99% लोक विषारी हवेच्या संपर्कात श्वास घेत आहेत. वायू प्रदूषणाचा थेट परिणाम तुमच्या फुफ्फुसापर्यंत पोहोचत आहे, तुम्ही श्वास घेत असलेली हवा इतकी दूषित झाली आहे की ती सुधारली नाही तर श्वास घेण्यायोग्य हवाच राहणार नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जागतिक आरोग्य संघटनेच्या या अहवालाचा सरळ अर्थ असा आहे की, पृथ्वीवरील ७९७ कोटी लोकांना वायुप्रदूषणामुळे प्रदूषित झालेल्या हवेत श्वास घ्यावा लागत आहे. ही अत्यंत भयावह बाब आहे, कारण अशीच हवा विषारी होत राहिली तर काही वर्षांत मानवाला हवा स्वच्छ करणारे रासायनिक मास्क घालून फिरावे लागेल. WHO ने सहा महिन्यांपूर्वी जगभरातील हवेच्या गुणवत्तेबाबत नवीन आणि कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यानंतरही परिस्थिती होती तशीच आहे.

WHO ने 117 देशांमधील 6,000 हून अधिक शहरांच्या हवेच्या गुणवत्तेची तपासणी केली. त्यानुसार अनेक देशांमध्ये हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण केले जात असल्याचे संशोधनाचे निष्कर्ष सांगतात. पण तिथे राहणाऱ्या लोकांनी श्वास घेतल्यावर नायट्रोजन डायऑक्साइड आणि अगदी लहान कण थेट त्यांच्या फुफ्फुसात पोहोचत आहेत. विशेषत: प्रदूषित हवेची समस्या कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये सर्वाधिक आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत