There will be no tolls on highways in the next two years

पुढील दोन वर्षात टोलनाक्यांपासून होईल मुक्तता, जाणून घ्या कशी?

देश

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. “पुढील दोन वर्षात टोलनाक्यांपासून मुक्तता होईल,” असं नितीन गडकरी यांनी जाहीर केलं आहे. “पुढील दोन वर्षात महामार्गांवर कोणताही टोलनाका नसेल, यामुळे वाहनांना पैसे भरण्यासाठी थांबण्याची किंवा वाहनाची गती कमी करण्याची गरज नाही,” असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नितीन गडकरी अ‍ॅसोचॅम कॉन्फरन्समध्ये बोलत असताना सांगितलं कि, मंत्रालय सध्या जीपीएस यंत्रणेच्या सहाय्याने टोल वसूल करण्याच्या प्रस्तावावर काम करत आहे. सर्व नवी वाहनं जीपीएस सिस्टमशी जोडले जातील असंही यावेळी त्यांनी सांगितलं. जीपीएस यंत्रणेच्या सहाय्याने बस तसंच ट्रक चालकांकडून टोल वसूल केला जाणार आहे. जीपीएस यंत्रणाद्वारे या वाहनांनी किती अंतर पार केलं आहे याचं मोजमाप करून आपोआप टोलची रक्कम वसूल केली जाईल.

सध्या फास्टटॅग या नव्या प्रणालीमुळे टोलनाक्यांवरील वाहनांचा वेग कमी होण्याचं किंवा थांबवण्याचं प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं आहे. नितीन गडकरी यांनी चालू आर्थिक वर्षात राष्ट्रीय महामार्गावर वसूल होणाऱ्या टोलची रक्कम ३४ हजार कोटी इतकी असेल अशी माहिती दिली आहे. गतवर्षी ही रक्कम २४ हजार कोटी इतकी होती असंही त्यांनी सांगितलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत