last chance for 11th admission

अकरावीला प्रवेश घेण्याची शेवटची संधी, 16 फेब्रुवारीपर्यंत मिळाली मुदतवाढ

महाराष्ट्र शैक्षणिक

मुंबई : काही कारणास्तव ज्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेता आला नाही, त्यांना प्रवेश घेण्यासाठी 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत FCFS 2.0 ला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. FCFS मधून अर्ज करणे व allotment घेण्यासाठी 16 फेब्रुवारी 2021 रात्री 10:00 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर Allotment मिळालेल्या विद्यार्थ्यांना आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

प्रवेश रद्द करण्यासाठी 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 06:00 वा.पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी मिळालेल्या वाढीव वेळेत आपला प्रवेश घ्यावा. ही 2020-21 साठी प्रवेश घेण्याची शेवटची संधी आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत