Tarun Tejpal Acquitted of Rape Charges by Goa District Court

ब्रेकिंग : तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची 8 वर्षानंतर बलात्कार प्रकरणात निर्दोष मुक्तता

देश

गोवा : उत्तर गोव्यातील मापुसा येथील जिल्हा व सत्र कोर्टाने शुक्रवारी पत्रकार तरुण तेजपाल यांना 2013 मधील बलात्कार प्रकरणात निर्दोष मुक्त केले. तहलकाचे माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल यांच्यावर 2013 मध्ये गोव्यातील लक्झरी हॉटेलच्या लिफ्टमध्ये एका सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील सर्व आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गोवा पोलिसांनी तरुण तेजपाल यांच्याविरोधात नोव्हेंबर 2013 मध्ये गुन्हा नोंदविला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मे 2014 पासून ते जामिनावर बाहेर होते. गोवा गुन्हे शाखेने तेजपाल यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल केले होते. त्यांच्यावर आयपीसी कलम 34१, 34२, 354 (अत्याचार किंवा विनयभंगाचा हेतू असणारी गुन्हेगारी ताकत), 354-ए (लैंगिक छळ), 354-बी (प्राणघातक हल्ल्याचा किंवा गुन्हेगारी शक्तीचा वापर) अंतर्गत खटल्यांचा सामना करावा लागला. dis 376 (२) (एफ) (महिलांवर अधिकार गाजवणे, बलात्कार करणे) आणि 376 (२) (के) या कलमांतर्गत आरोप लावण्यात आले होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत