The deadly form of the corona virus in Britain, the central government called an emergency meeting
देश

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे घातक रूप, केंद्र सरकारने बोलावली तातडीची बैठक

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे नवे आणि घातक रुप समोर आले आहे. या रुपातील विषाणू वेगाने पसरत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. इंग्लंडचे मुख्य चिकित्सा अधिकारी क्रिस व्हिटी यांनी शनिवारी याला दुजोरा दिला आहे. कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळे नेदरलँड, बेल्जियम, इटली आणि जर्मनीने यूकेमधून येणाऱ्या विमानसेवांवर बंदी घातली आहे. आता भारतात देखील ब्रिटनमधून येणाऱ्या विमानसेवांवर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ब्रिटनचे आरोग्य चिकित्सा अधिकारी क्रिस व्हिटी यांनी कोरोना विषाणूचे नवे रुप पहिल्या विषाणूपेक्षा वेगळे असेल, असं सांगितले. या विषाणूचा वेगाने संसर्ग होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक ठिकाणी अधिक काळजी घेण्याचे आवाहन क्रिस व्हिटी यांनी केले आहे. ब्रिटनने यापूर्वीच इतर देशांनी विमानसेवांवर बंदी घालण्याबाबत सुचवले होते. भारत सरकार याबाबत सतर्क असून आरोग्य सेवा महानिर्देशक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य देखील यामध्ये सहभागी होऊ शकतात.

ब्रिटनमध्ये नव्यानं आढळलेल्या कोरोना विषाणूमुळे लंडन, साऊथ इंग्लंडमधील इतर महत्त्वाच्या ठिकाणी चौथ्या टप्प्यातील कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोना विषाणू संसर्गामुळे ख्रिसमस आणि इतर सण पहिल्यासारखे साजरे करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोना विषाणूचं नवे रुप आढळून आले असल्याचं स्पष्ट केले. कोरोनाचे नवे वेरियंट देशात पसरत आहे. यामुळे रुगणालयातील रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती बोरिस जॉन्सन यांनी दिली. रुग्णांची संख्या वाढली असली तरी मृत्यूंची संख्या वाढलेली नाही. कोरोना विषाणू संसर्गाचे स्वरुप बदलले असेल तर आपल्याला देखील रणनिती बदलली पाहिजे, असं जॉन्सन यांनी स्पष्ट केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत