बिहार : बिहारच्या जेहानाबादमध्ये श्रावणी जत्रेदरम्यान श्रावणी सोमवारी सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ७ कावड धारकांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा बारा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. बराबर टेकडीवर भाविक एका बाजूने उतरत होते […]
Tag: bihar
बिहारमध्ये मालगाडीचे 20 डबे रुळावरून घसरले, वाहतूक विस्कळीत
बिहार : बिहारमधील दीनदयाल उपाध्याय-गया रेल्वे मार्गावर रेल्वे अपघात झाला. रोहतास जिल्ह्यातील कुमहाऊ रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सकाळी मालगाडीचे सुमारे 20 डबे रुळावरून घसरले. त्यामुळे या रेल्वे मार्गावरील गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 6.30 च्या सुमारास पंडित दीनदयाल उपाध्याय विभागातील DDU-गया ग्रँड चोर्ड रेल्वे […]
मोठी बातमी! बिहारमध्ये सर्वांना मोफत मिळणार कोरोनाचा प्रिकॉशन डोस, हा निर्णय घेणारे पहिलेच राज्य
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत एकूण 26 अजेंड्यांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीत कोरोना लसीचा प्रिकॉशन डोस घेण्यास पात्र असलेल्या राज्यातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या कामासाठी 1314.15 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चासही मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय बिहार आकस्मिकता निधीसाठी ५८३.४३ कोटी रुपये […]
गंगा नदीत मालवाहू जहाजाचे संतुलन बिघडल्याने अपघात, ५ ट्रकसह अनेक जण बुडाले
झारखंडमधील साहिबगंज आणि बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील मनिहारी घाट दरम्यान गंगा नदीत मालवाहू जहाजाचा बॅलन्स गेल्याने अपघात घडला आहे. या जहाजावर दगड भरलेले सुमारे 14 ट्रक होते. यासोबतच सर्व ट्रकचे चालक आणि मदतनीसही या जहाजावर होते. या अपघातात जहाजाच्या कॅप्टन टीमसह ट्रकचे चालक-मदतनीस अशा सुमारे 10 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत […]
Video : स्वतंत्रता सेनानी एक्सप्रेसला भीषण आग, मधुबनी रेल्वे स्थानकावरील घटना
बिहार : बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानकावर एका ट्रेनला अचानक आग लागल्याची मोठी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी दिल्लीहून येणाऱ्या स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस गाडीला अचानक आग लागली. काही वेळातच ट्रेनने पेट घेतला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ट्रेनला लागलेली आग किती भीषण होती, हे फोटो पाहून समजू शकते. सुदैवाने ट्रेन पूर्णपणे रिकामी होती. […]
आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या, छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह
बिहार : बिहारमधील मुंगेर येथे एका आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. नराधमांनी मुलीचा एक डोळा देखील फोडला. तसेच या मुलीच्या हाताची बोटंदेखील ठेचण्यात आलेली आहेत. या घटनेमुळे संतापाची लाट पसरली आहे. सफिया सराय स्टेशन क्षेत्रातील पुरवारी टोला फरदा गावात ही घटना घडली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास […]
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या, खिडकी फोडून घरात घुसले आरोपी…
बिहार : पाच जणांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या वेळी पाच जणांनी खिडकी फोडून घरात प्रवेश केला आणि ते अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने घेऊन गेले. या नराधमांनी पहिल्यांदा तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, त्यानंतर मुलीची हत्या करून त्यांनी तिचा मृतदेह झाडीत फेकून दिला. ही घटना वैशाली जिल्ह्यातील भगवानपूर […]
भयंकर : पित्यानेच कुऱ्हाडीने वार करून केली दोन मुलांची हत्या, आणि…
पाटणा : बिहारची राजधानी पाटणाला लागून असलेल्या मोकामा येथे एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. ही घटना नगर पोलीस स्टेशन परिसरातील कन्हाईपुर गावातील आहे. येथील एका विक्षिप्त वडिलांनी गुरुवारी रात्री उशिरा आपल्या दोन मुलांचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. चंदन महतो असे या आरोपीचे नाव आहे. चंदन महतो याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यावरून त्याने […]
‘भय इथले संपत नाही’ : आता पांढर्या बुरशीचे रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ
पाटणा : काळी बुरशी (म्यूकरमायकोसिस) नंतर आता पांढर्या बुरशीचे रुग्ण आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. काळ्या बुरशीच्या तुलनेत अधिक घातक मानली जाणारी पांढरी बुरशी या आजाराचे चार रुग्ण सापडले आहेत. पांढरी बुरशी (कॅन्डिडोसिस) फुफ्फुसांच्या संसर्गाचे मुख्य कारण आहे. फुफ्फुसांव्यतिरिक्त ते त्वचा, नखे, तोंडातील अंतर्गत भाग, पोट आणि आतडे, मूत्रपिंड, जननेंद्रिय आणि मेंदू इत्यादींना देखील संक्रमित […]
कोरोनाचा विस्फोट!, एकाच रूग्णालयातील ३८४ डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोना पॉझिटिव्ह
पाटणा : पाटणा एम्स रुग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालाय, असं पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितलं आहे. पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षक म्हणाले की, रुग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालाय. बिहारमधील पंचायत निवडणुका कोरोनाच्या वाढत्या प्रकरणात पुढे ढकलण्यात आल्यात. निवडणुकीसंदर्भात अधिसूचना एप्रिल अखेर जारी करण्यात येणार होती, पण […]