Fire breaks out in train at Madhubani railway station in Bihar
देश

Video : स्वतंत्रता सेनानी एक्सप्रेसला भीषण आग, मधुबनी रेल्वे स्थानकावरील घटना

बिहार : बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानकावर एका ट्रेनला अचानक आग लागल्याची मोठी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी दिल्लीहून येणाऱ्या स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस गाडीला अचानक आग लागली. काही वेळातच ट्रेनने पेट घेतला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ट्रेनला लागलेली आग किती भीषण होती, हे फोटो पाहून समजू शकते. सुदैवाने ट्रेन पूर्णपणे रिकामी होती. ही ट्रेन रात्रीच दिल्लीहून मधुबनीला पोहोचली होती आणि स्टेशनवर उभी असताना तिला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानकावर उपस्थित नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. दरम्यान, आग कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मधुबनी रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या (स्वतंत्र सेनानी सुपरफास्ट एक्स्प्रेस) रिकाम्या डब्यांना लागलेली आग सकाळी ९.५० वाजता आटोक्यात आली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत