Defense Minister Rajnath Singh informed about the ongoing border dispute with China

सैन्य मागे घेण्याबाबत चीन बरोबर सहमती, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली माहिती

देश

लडाखमध्ये चीन बरोबर सुरु असलेल्या सीमावादाच्या विषयावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज संसदेत बोलत होते. पँगाँग टीसओ सरोवर भागातून सैन्य मागे घेण्याबाबत चीन बरोबर सहमती झाल्याची माहिती यावेळी राजनाथ सिंह यांनी संसदेला दिली. भारत आपली एक इंच जमीनही कोणाला घेऊ देणार नाही, असंदेखील ते यावेळी म्हणाले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भारत आणि चीन सैन्याच्या जवानांनी पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तरेकडेल किनाऱ्यावरुन मागे येण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि चीन यांच्यात चर्चेच्या नवव्या फेरीत सहमती झाल्यावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिली आहे. तसेच द्विपक्षीय चर्चेत भारतानं काहीच गमावलेलं नाही, असे देखील सिंह म्हणाले.

पँगाँग सरोवराच्या भागातील सैन्य तैनाती हा मुख्य मुद्दा असून चीनने इथे फिंगर फोरपर्यंत सैन्य तैनात केल्याने वाद चिघळत गेला. चीन बरोबरच्या चर्चेतून पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि पूर्व किनाऱ्यावरुन सैन्य माघारीवर सहमती झाली आहे. टप्याटप्याने आणि समन्वय साधून भारत-चीन फॉरवर्ड भागातून सैन्य मागे घेईल” असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

“पाकिस्तानने बेकायदेशीररीत्या भारताची भूमी चीनला दिली. त्याला आम्ही कधीच मान्यता देणार नाही. चीनने भारताच्या मोठया भूभागावर दावा सांगितला आहे. पण आम्ही त्यांचे हे अयोग्य दावे कधीच मान्य केले नाहीत” असे राजनाथ सिंह म्हणाले. तसेच “लडाखमध्येही चीनने एकतर्फी चाल केली. भारत आपल्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यास समर्थ आहे. कराराचे उल्लंघन करुन चीनने नियंत्रण रेषेवर मोठया संख्येने सैन्य तैनाती केली, त्यावेळी भारताने सुद्धा आपल्या हिताच्या दृष्टीने तशीच भूमिका घेत मोठया प्रमाणावर सैन्य तैनात केले” असे त्यांनी स्पष्ट केले.

“पँगाँग सरोवराच्या परिसरातून दोन्ही देशांचे सैन्य पूर्णपणे माघारी फिरल्यानंतर ४८ तासांनी दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य कमांडर्समध्ये बैठक होईल. अन्य मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी या बैठकीत चर्चा होईल. पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावरील फिंगर आठच्या पूर्व दिशेला चीन आपले सैनिक तैनात करेल, भारत फिंगर तीनपर्यंत सैन्याची तैनाती करेल” असे राजनाथ सिंह म्हणाले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत