Mumbai Filmmaker Imtiaz Khatri Raided By Anti-Drugs Agency In Cruise Ship Drug Case

चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरावर एनसीबीचा छापा, आढळले ड्रग्स

मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

मुंबई : चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या मुंबईच्या बांद्रा येथील घरावर आणि कार्यालयावर क्रूझ ड्रग्स प्रकरणाच्या संदर्भात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) छापे टाकले. याच प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसोबत आणखी ७ जणांना अटक करण्यात आली होती. प्रोड्युसर इम्तियाज खत्रीच्या घरी छापा टाकत त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता 18 झाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

इम्तियाज खत्री यांचे नाव अचिव कुमारच्या चौकशीदरम्यान समोर आले. त्यानंतर इम्तियाज खत्री या प्रोड्युसरला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडे काही प्रमाणात ड्रग्स आढळून आले आहेत. क्रूझ पार्टीत इम्तियाज खत्रीने ड्रग्स पुरवल्याची माहिती आहे. खत्री अचिव कुमारशी व्हॉट्सऍप चॅट करत असल्याचंही आढळून आलं आहे. अचिव कुमारला या आठवड्याच्या सुरुवातीला उपनगरी पवई येथून अटक करण्यात आली होती, त्याच्या ताब्यातून थोड्या प्रमाणात “हायड्रोपोनिक वीड उर्फ मल्टी-स्ट्रेन कॅनॅबिस” जप्त करण्यात आले होते.

इम्तियाज खत्री हा पेश्याने एक बिल्डर आहे. INK इंफ्रास्ट्रक्चर नावाची त्याची एक कंपनी आहे. तसेच मुंबईमध्ये त्याची एक क्रिकेट टीमसुद्धा आहे. त्याची वीवीआईपी यूनिवर्सल एंटरनेटमेंट नावाचीसुद्धा कंपनी आहे. तो बॉलिवूड चित्रपटांमध्ये पैशांची गुंतवणूक करतो.

 

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत