Drugs case: Arjun Rampal's troubles escalate

ड्रग्ज प्रकरण : अर्जुन रामपालच्या अडचणीत वाढ

मनोरंजन

ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची अडचण वाढू शकते. आज (21 डिसेंबर) अर्जुन रामपाल पुन्हा एनसीबीसमोर हजर झाला. या प्रकरणात एनसीबीने दिल्लीच्या डॉक्टरांची चौकशी केली आहे. एनसीबीने न्यायालयात 164 अंतर्गत न्यायाधीशांकडेही डॉक्टरांचे निवेदन सादर केले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या प्रकरणात डॉक्टर म्हणाले कि, ‘ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी एनसीबीला सांगितल्या आहेत आणि माझे निवेदन दंडाधिकाऱ्यांसमोर दिले आहे. मी एनसीबीला मदत करेन.’ मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने मुंबईतील डॉक्टरांचे निवेदनही घेतले आहे. अर्जुन रामपालच्या एका साथीदाराने एनसीबीच्या तपासातून वाचण्यासाठी दिल्लीतील एका डॉक्टरची दिशाभूल केली आणि अगोदरच्या तारखेच्या प्रिस्क्रिप्शन लिहून घेतल्या. अर्जुन रामपालने त्या प्रिस्क्रिप्शन NCB समोर ठेवल्या होत्या. NCB च्या अधिकाऱ्यांनी संशयावरून डॉक्टरकडे चौकशी केली व ते निवेदन रेकॉर्ड करून घेतले.

अर्जुन रामपालच्या घरावर छापा टाकला तेव्हा NDPS कायद्यांतर्गत येणारे औषध ताब्यात घेण्यात आले. ते औषध NDPS कायद्याच्या अनुसूची एच अंतर्गत येते, ज्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता असते. मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी त्यांनी डॉक्टरांचीही दिशाभूल केली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत