Sadabhau Khot criticizes Sharad Pawar for advice given to Sachin

शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का तरी ते अध्यक्ष होते, सचिनला दिलेल्या ‘त्या’ सल्ल्यावरून सदाभाऊ खोत यांची टीका

महाराष्ट्र

सातारा : शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्या परदेशातील सेलिब्रिटींविरोधात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्वीट केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘ज्यांना ज्या क्षेत्रातलं कळतं त्यातलं त्यांनी बोलावं’ असा सल्ला सचिनला दिला होता. यावरून आता सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले कि, शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का, तरी ते अध्यक्ष होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पॉप गायिका रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता, त्यानंतर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्वीट करत म्हटलं होतं कि, “भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. बाह्य शक्ती प्रेक्षक असू शकतात परंतु यात सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि त्यांनी भारतासाठी निर्णय घ्यावा. चला एक राष्ट्र म्हणून एकजूट राहू या.”

सचिनने केलेल्या ट्विटनंतर अनेक जणांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. त्यातच शरद पवार यांनी देखील सचिनला सल्ला दिला कि, आपलं क्षेत्र सोडून इतर गोष्टी बोलताना काळजी घ्यावी.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यावर आता सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का? तरी ते अध्यक्ष होते. ते कोणत्या फडात कुस्ती खेळले? तरीही ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. अनेकांना वाटतं मला सोडून दुसऱ्याला कळत नाही. अशी कमी लेखण्याची पद्धत काही लोकांनी राज्यात लावली आहे. हे योग्य नसून नवीन नेतृत्वाला हानीकारक आहे.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत