BJP Yuva Morcha activists blocked Deputy Chief Minister Ajit Pawar's car

ब्रेकिंग : भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी अडवली

नागपूर महाराष्ट्र

नागपूर : नागपूरजवळील वाडी परिसरात भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यांवरुन भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून यावेळी थेट उपमुख्यमंत्र्यांनाच घेराव घातला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राज्यात लॉकडाऊनच्या काळात जनतेला वाढीव वीज बील आले आहेत. वीज बिलातून ग्राहकांना सूट द्यावी या मागणीसाठी भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवारी भाजपनं वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर सरकारविरोधात आंदोलनही केलं होतं. त्यानंतर आज भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी अडवली आहे.

वाढीव वीज बिल माफीची मागणी करणारे निवेदन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते जमले होते. मात्र, अजित पवार गाडी न थांबवता निघून जात होते. तसंच, आमचं निवेदनही त्यांनी स्विकारलं नाही. म्हणून त्यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला, असं भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत