A crack fell in Ambenali Ghat, notices to travel with caution on the ghat

आंबेनळी घाटात दरड कोसळली, घाटमाथ्यावर सतर्कतेने प्रवास करण्याच्या सूचना

महाराष्ट्र

रायगड : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी-जास्त होत असला तरी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. रायगड जिल्ह्यात आंबेनळी घाटात चिरेखिंडी येथे दरड कोसळली आहे. यामुळे महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान वाहतूक ठप्प झाली आहे. दरड हटवून वाहतूक पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोकणात 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सततच्या पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने घाटमाथ्यावर वाहनचालकांनी सतर्कतेने प्रवास करावा. मंगळवारी रात्री उशिरा या घाटात दरड कोसळली आहे. काही वेळापूर्वी सकाळी याच घाटात आणखी एक दरड कोसळली आहे. हा घाट पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर या घाटात सातत्याने दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.

रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. सह्याद्री खोऱ्यात तसेच रायगड आणि रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरू आहे. महाड पोलादपूर रस्ताही पाण्याखाली गेला आहे. त्यानंतर रायगड जिल्हा प्रशासनाकडून हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक नियंत्रित पद्धतीने सुरू करण्यात आली. मात्र आता पुन्हा मोठी दरड कोसळल्याने घाटाच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हा घाट पावसाळ्यात तीन महिने वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवावा, असा प्रस्ताव महाड प्रशासनाने रायगड जिल्हा प्रशासनाला दिला आहे. मात्र, आंबेनळी घाटाबाबत जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आता या सर्व घटनाक्रमानंतर रायगड जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पालघर, रायगड, पुणे, सातारा येथील घाट परिसरात बुधवारी रेड अलर्ट आहे. दरम्यान, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी आज रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत