Eknath Khadse join NCP

एकनाथ खडसे यांची 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त, ईडीची मोठी कारवाई

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून एकनाथ खडसे यांची जळगाव आणि लोणावळा येथील 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची गेल्या काही दिवसांपासून चौकशी ईडीकडून सुरु आहे. 2016 मध्ये महसूलमंत्री असताना खडसे आणि त्यांचे […]

अधिक वाचा
ncp mp amol kolhe tests covid positive

लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोना पॉझिटिव्ह; अमोल कोल्हेंचे रुग्णालयातून हात जोडून आवाहन…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ते सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. कोल्हे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते मात्र, तरिही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यानंतर कोल्हे यांनी रुग्णालयातून सर्व नागरिकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. खासदार अमोल कोल्हे व्हिडीओच्या माध्यमातून […]

अधिक वाचा
devendra fadnavis and ajit pawar

पहाटेच्या शपथविधीवर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, ‘ती’ आमची चूकच, प्रतिमेला तडा गेला….

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केल्याचा पश्चाताप होत नाही. पण असं सरकार स्थापन करायला नको होतं. ती चूकच होती. शंभर टक्के सांगतो. ती चूकच होती. पण त्याचा पश्चाताप होत नाही, अशी कबुलीच देवेंद्र फडणवीस यांनी […]

अधिक वाचा
pimpari chinchwad unknown person fired on ncp mla anna bansode

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार

पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार झाला आहे. ही घटना आज (बुधवारी, दि. 12) दुपारी दीड वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास पिस्तुलातून गोळी झाडली. सुदैवाने या घटनेत कोणीही […]

अधिक वाचा
NCP chief Sharad Pawar endoscopy surgery completed

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, २-3 दिवसांत रुग्णालयातून घरी सोडणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही. मात्र, शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरवरही आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. ही शस्त्रक्रिया नक्की कधी करायची, याचा […]

अधिक वाचा
Sharad Pawar admitted to Breach Candy Hospital

शरद पवार यांची प्रकृती बिघडली, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं असून त्यांची प्रकृत्ती स्थिर आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. नवाब मलिक म्हणाले कि, “आमचे अध्यक्ष शरद पवार […]

अधिक वाचा
devendra fadnavis press conference

सचिन वाझेंचे सर्व मालक चिंतेत की तो NIA ला काय सांगेल : देवेंद्र फडणवीस

नागपूर :  सचिन वाझेंचे सर्व मालक याच चिंतेत आहेत की सचिन वाझें NIA ला काय सांगेल, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हल्लाबोल केला आहे. नवाब मलिक का बरं चिंतेत आहेत? कारण फोन टॅपिंग रिपोर्टमध्ये अनेक लोकांचे बिंग फुटेल. काँग्रेससह हे तिन्ही पक्ष अस्वस्थ आहेत. कारण वाझेंचे हे खरे मालक आहेत. यांनी वाझेंकडून काय काय […]

अधिक वाचा
home minister anil deshmukh clarification on Travel in flight on 15 February

15 फेब्रुवारीला अनिल देशमुख यांनी केला फ्लाईट मध्ये प्रवास? देशमुख यांनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख सर्वांच्या निशाण्यावर आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात बराच काळ रुग्णालयात होते. त्यानंतर 15 फेब्रुवारीला अनिल देशमुख यांनी चार्टर्ड फ्लाईट मध्ये प्रवास केल्याची माहिती समोर आली. त्यावर आता अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण […]

अधिक वाचा
Sadabhau Khot criticizes Sharad Pawar for advice given to Sachin

शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का तरी ते अध्यक्ष होते, सचिनला दिलेल्या ‘त्या’ सल्ल्यावरून सदाभाऊ खोत यांची टीका

सातारा : शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्या परदेशातील सेलिब्रिटींविरोधात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्वीट केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘ज्यांना ज्या क्षेत्रातलं कळतं त्यातलं त्यांनी बोलावं’ असा सल्ला सचिनला दिला होता. यावरून आता सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले कि, शरद […]

अधिक वाचा
Sharad Pawar's suggestive statement after Nana Patole resigned as the Speaker of the Assembly

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांचे सूचक वक्तव्य

मुंबई : काँग्रस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हे पद कोणाला मिळणार, याची चर्चा सुरु झाली आहे. विधानसभा अध्यक्षपद मिळवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष इच्छूक आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत दबावामुळे पक्षाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपद काँग्रेसकडे […]

अधिक वाचा