नागपूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर ५ डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला होता. मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आणि नागपूरमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजपच्या १९ मंत्र्यांनी, शिवसेना शिंदे गटाच्या ११ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली.
विधानसभा निवडणुकीत भाजपने १३२ जागा जिंकून पहिलं स्थान मिळवलं. राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४१ आणि शिवसेना शिंदे गटाला ५७ जागांवर विजय मिळाला. मंत्रिमंडळ विस्ताराची प्रचंड उत्सुकता होती, कारण कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर, नव्या मंत्र्यांची यादी जाहीर झाली.
यावेळी मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली, तर काही अनुभवी नेत्यांचा पत्ता कट झाला. राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश नव्या मंत्रिमंडळात नाही. तसेच शिवसेना शिंदे गटाचे दीपक केसरकर यांचं नावही यादीत नाही. भाजपकडून रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान नाही.
नव्या मंत्र्यांची यादी:
भाजप:
– चंद्रशेखर बावनकुळे
– राधाकृष्ण विखे पाटील
– चंद्रकांत पाटील
– गिरीश महाजन
– गणेश नाईक
– मंगलप्रभात लोढा
– जयकुमार रावल
– पंकजा मुंडे
– अतुल सावे
– अशोक उईके
– आशिष शेलार
– संजय सावकारे
– नितेश राणे
– आकाश फुंडकर
– माधुरी मिसाळ – राज्यमंत्री
– पंकज भोयर – राज्यमंत्री
– मेघना बोर्डीकर – राज्यमंत्री
– शिवेंद्रसिंहराजे भोसले
शिवसेना:
– गुलाबराव पाटील
– दादा भुसे
– संजय राठोड
– उदय सामंत
– शंभूराज देसाई
– संजय शिरसाट
– प्रताप सरनाईक
– भरत गोगावले
– प्रकाश आबिटकर
– आशीष जैस्वाल – राज्यमंत्री
– योगेश कदम – राज्यमंत्री
राष्ट्रवादी:
– हसन मुश्रीफ
– धनंजय मुंडे
– दत्तात्रय भरणे
– आदिती तटकरे
– माणिकराव कोकाटे
– नरहरी झिरवळ
– मकरंद जाधव
– बाबासाहेब पाटील
– इद्रनील नाईक




