गुजरात : गुजरातच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्त्वाखालील सध्याच्या मंत्रिमंडळाने अचानक सर्व सदस्यांचे राजीनामे सादर केले. हे राजीनामे केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर घेण्यात आले असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकदरम्यान वरिष्ठ नेत्यांनी मंत्र्यांना हा निर्णय समजावून सांगितला. यानंतर सर्व मंत्र्यांनी आपापले राजीनामे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे सुपूर्द केले. सुरुवातीला […]
टॅग: cabinet expansion
छगन भुजबळ यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन, घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी आज राजभवन येथे राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या मंत्रिमंडळात त्यांना डावलण्यात आले होते. मात्र, सुमारे सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर भुजबळ यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन झाले आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदासाठी भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे. […]
ज्यांनी मला डावललं त्यांना कारण विचारा…, छगन भुजबळांनी जाहीर केली नाराजी
नागपूर : छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर नाराजी व्यक्त केली आहे. ”जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मला मिळालं आहे. नव्यांना संधीसाठी ज्येष्ठांना डावललं जातंय. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय आणि फेकलं काय, मला काही फरक पडत नाही. असं मंत्रिपद कितीवेळा आलं आणि कितीवेळा गेलं, पण मी कधी संपलेलो नाहीय. […]
मंत्रिमंडळ विस्तार: नव्या मंत्र्यांचा शपथविधी, ‘या’ दिग्गज नेत्यांचा पत्ता कट
नागपूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर ५ डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला होता. मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आणि नागपूरमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजपच्या १९ मंत्र्यांनी, शिवसेना शिंदे गटाच्या ११ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत […]
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी आमच्यासोबतच नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेशीही विश्वासघात केला – अमित शाह
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. या विजयानंतर राज्यात स्थापन झालेल्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज (रविवारी) नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा विस्तार होणार आहे. परंतु, किती मंत्र्यांचा शपथविधी होणार आणि घटक पक्षांना किती मंत्रीपदे […]
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेवाटपात कोणत्या मंत्र्याला कोणते खाते? जाणून घ्या…
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून १५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेवाटपात मोठे बदल दिसून येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कार्मिक, पेन्शन आणि नागरी तक्रारी खात्यासह ते विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयावर लक्ष ठेवतील. तर अमित शहांकडे गृहमंत्रालयासह सहकार मंत्रालयाचा अतिरिक्त भार देण्यात […]






