pm modi cabinet expansion

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेवाटपात कोणत्या मंत्र्याला कोणते खाते? जाणून घ्या…

देश राजकारण

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून १५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेवाटपात मोठे बदल दिसून येत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कार्मिक, पेन्शन आणि नागरी तक्रारी खात्यासह ते विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयावर लक्ष ठेवतील. तर अमित शहांकडे गृहमंत्रालयासह सहकार मंत्रालयाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे.

कॅबिनेट मंत्री नारायण राणे : लघु, मध्यम उद्योग खाते
राज्यमंत्री भारती पवार : आरोग्य आणि कुटुंब कल्याण खातं
राज्यमंत्री भागवत कराड : अर्थ खातं
राज्यमंत्री कपिल पाटील : पंचायत राज खातं
राज्यमंत्री रावसाहेब दानवे : रेल्वे, कोळसा आणि खाण मंत्रालयाची जबाबदारी
राज्यमंत्री रामदास आठवले : सामाजिक न्याय खाते
पियुष गोयल : वाणिज्य मंत्रालय तसेच वस्त्रोद्योग आणि ग्राहक कल्याण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी
अश्विनी वैष्णव : रेल्वे मंत्री तसेच माहिती तंत्रज्ञान आणि संपर्क या खात्याचीही जबाबदारी
धर्मेंद्र प्रधान : शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री
स्मृती इराणी : महिला आणि बाल विकास खातं, यासोबत त्या स्वच्छ भारत मोहीमेचे कामही पाहतील.
किरेन रिजीजू : कायदा आणि न्यायमंत्री
मनसुख मांडवीय : आरोग्यमंत्री तसेच खते आणि रसायन मंत्रीपद
हरदीप सिंग पुरी : नगरविकास, गृहनिर्माण आणि पेट्रोलियम मंत्रालय
अनुराग ठाकूर : माहिती आणि प्रसारण मंत्रालयासह क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी
ज्योतिरादित्य शिंदे : नागरी हवाई वाहतूक मंत्रालय
पुरुषोत्तम रुपाला : दुग्ध, पशुपालन आणि मत्स्य विकास मंत्रालय
भूपेंद्र यादव : कामगार खातं
गिरीराज सिंह : ग्रामविकास मंत्री
सरबानंद सोनोवाल : जहाज वाहतूक, बंदरे आणि जलवाहतूक खात्यासह आयुष मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी
पशुपती पारस : अन्न प्रक्रिया मंत्री
धर्मेंद्र प्रधान : शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री
गजेंद्रसिंह शेखावत : जलशक्ती मंत्री
भगवंत खुबा : अपारंपरिक उर्जा विभाग आणि खते-रसायन विभाग राज्यमंत्री
कपिल पाटील : पंचायती राज राज्यमंत्री
प्रतिमा भौमिक : सामाजिक न्याय राज्यमंत्री
सुभास सरकार : शिक्षण राज्यमंत्री
राजकुमार रंजन सिंह : परराष्ट्र विभाग आणि शिक्षण राज्यमंत्री
विश्वेश्वर टुडू : आदिवासी विकास आणि जलशक्ती विभाग राज्यमंत्री
शांतनु ठाकूर : बंदर, जलवाहतूक राज्यमंत्री
मुंजपरा महेंद्र : महिला व बालकल्याण आणि आयुष विभाग राज्यमंत्री
जॉन बारला : अल्पसंख्याक राज्यमंत्री
एल. मुरुगन : मासेमारी, पशुपाल आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री, माहिती व प्रसारण राज्यमंत्री
निसिथ प्रामाणिक : गृह राज्यमंत्री, युवा आणि क्रीडा राज्यमंत्री
अनुप्रिया पटेल : उद्योग राज्यमंत्री
एस. पी. बघेल : कायदा व न्याय राज्यमंत्री
राजीव चंद्रशेखर : कौशल्य विकास, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री
शोभा करंदलजे : कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री
दर्शन जरदोश : टेक्स्टाईल, रेल्वे राज्यमंत्री
व्ही. मुरलीधरन : परराष्ट्र, संसदीय कार्य राज्यमंत्री
मीनाक्षी लेखी : परराष्ट्र, सांस्कृतिक राज्यमंत्री
अन्नपूर्णा देवी : शिक्षण राज्यमंत्री
अजय भट : संरक्षण, पर्यटन राज्यमंत्री
अजय कुमार : गृह राज्यमंत्री

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत