lpg gas cylinder price commercial cylinder price hike
अर्थकारण देश

एलपीजी गॅस सिलिंडर २५० रुपयांनी महागले, महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका

LPG Price : एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा जोरदार झटका बसला आहे. व्यावसायिक सिलिंडर पुन्हा एकदा महाग झाला आहे. १९ किलोच्या सिलिंडरमध्ये २५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना दरवाढीचा झटका बसला आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झाला नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

१० दिवसांपूर्वीच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती. विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. २२ मार्च रोजी व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाला होता. मात्र आज नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशीच व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी दरवाढ करण्यात आली आहे. आजच्या दरवाढीनंतर १९ किलो एलपीजी सिलिंडरसाठी दिल्लीत आजपासून २२५३ रुपये मोजावे लागणार आहेत. तर, मुंबईत २२०५ रुपयांना १९ किलो एलपीजी सिलिंडर मिळणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत