The drunken man shot and killed his father

किरकोळ कारणावरून वाद; मुलाने वडिलांची केली गोळ्या घालून हत्या

देश

उत्तर प्रदेशातील कानपूर मध्ये दारूच्या नशेत असलेल्या मुलाने आपल्या वडिलांची गोळ्या घालून हत्या केली. घरातील टीव्ही बंद करण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर मुलाने वडिलांना गोळ्या घातल्या. आवाज ऐकून कुटुंबातील इतर जण बाहेर आले, तेव्हा वयोवृद्ध वडील जमिनीवर कोसळलेले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नसीरपूरमध्ये ही घटना घडली. लालाराम कटिहार (वय ८०) हे लष्करातून निवृत्त झालेल्या अशोक कटिहार या आपल्या मुलासह राहत होते. बुधवारी संध्याकाळी लालाराम कटिहार त्यांचा नातू ऋषभ याच्यासोबत टीव्ही पाहत होते. त्याचवेळी नशेत धुंद असलेला अशोक घरी आला आणि टीव्ही बंद करण्यास सांगू लागला. थोड्या वेळाने टीव्ही बंद करतो असे लालाराम यांनी सांगितले तर त्याने त्यांच्याशी वाद घातला. ऋषभला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचा वाचवण्यासाठी लालाराम पुढे आले. त्यावर राग अनावर झालेल्या अशोकने घरातील बंदूक आणली आणि वडिलांवर गोळ्या झाडल्या.

कानपूर देहातचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (ASP) अनुप कुमार यांनी सांगितले की, टीव्ही बंद करण्यावरून लालाराम आणि त्यांचा मुलगा यांच्यात वाद झाला. त्यानंतर अशोकने वडिलांना गोळ्या घालून ठार केले. घटनास्थळावरून बंदूक मिळाली आहे. आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत