मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी आज राजभवन येथे राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या मंत्रिमंडळात त्यांना डावलण्यात आले होते. मात्र, सुमारे सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर भुजबळ यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन झाले आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदासाठी भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे. […]
टॅग: Chhagan Bhujbal
ज्यांनी मला डावललं त्यांना कारण विचारा…, छगन भुजबळांनी जाहीर केली नाराजी
नागपूर : छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर नाराजी व्यक्त केली आहे. ”जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मला मिळालं आहे. नव्यांना संधीसाठी ज्येष्ठांना डावललं जातंय. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय आणि फेकलं काय, मला काही फरक पडत नाही. असं मंत्रिपद कितीवेळा आलं आणि कितीवेळा गेलं, पण मी कधी संपलेलो नाहीय. […]
मंत्रिमंडळ विस्तार: नव्या मंत्र्यांचा शपथविधी, ‘या’ दिग्गज नेत्यांचा पत्ता कट
नागपूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर ५ डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला होता. मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आणि नागपूरमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजपच्या १९ मंत्र्यांनी, शिवसेना शिंदे गटाच्या ११ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत […]
उत्तम आरोग्य, ग्रंथ वाचन व सुसंवाद ही आनंदी आयुष्याची त्रिसूत्री – छगन भुजबळ
नाशिक : ज्येष्ठ नागरिक होणे हा मानवी आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा आहे. जीवनात उत्तम आरोग्य, ग्रंथ वाचन व एकमेकांशी सुसंवाद या त्रिसूत्रीचा अंगिकार केल्यास आपण आनंदी आयुष्य जगू शकतो. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. येवला येथे स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ सभामंडप लोकार्पण प्रसंगी मंत्री छगन […]
राजकारण्यांना कोरोनाचा विळखा! आता छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. भुजबळ यांनी स्वतः याबाबत माहित दिली आहे. भुजबळ म्हणाले की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी […]
धान खरेदीला मुदतवाढ देण्यासंदर्भात प्रश्नाला छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिलं उत्तर
मुंबई : ज्या शेतकऱ्यांनी धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे, मात्र अद्याप धान खरेदी झालेली नाही अशा शेतकऱ्यांकडून धान खरेदीसाठी मुदतवाढीची मागणी आल्यास मुदतवाढ देण्याचा विचार करण्यात येईल, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदीला मुदतवाढ देण्यासंदर्भात विधानसभा सदस्य कृष्णा गजबे यांनी तारांकित प्रश्न विचारला […]
मैदानी खेळांची राजधानी म्हणून नाशिकची निर्माण झालेली ओळख कौतुकास्पद – पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक : नाशिक जिल्ह्याने राज्याला तसेच देशाला उत्तम खेळाडू दिले आहेत. नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी अधोरेखित केले आहे, याचा नाशिककरांना सार्थ अभिमान आहे. अलिकडे नाशिकला मैदानी खेळांची राजधानी म्हणून मिळणारी ओळख कौतुकास्पद असून हे केवळ खेळाडूंमुळे शक्य झाल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले […]
अन्न सुरक्षा कायद्यानुसार प्रत्येक गरजू पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांच्यापर्यांत अन्नधान्य पोहाेचावे
बीड : अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक गरजूला शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात यावी आणि अशा पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांच्यापर्यांत अन्नधान्य पोहचावे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. बीड जिल्हा […]
शहरी भागातील जनतेला मोठा दिलासा, शहरी भागातही नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करणार
मुंबई : राज्यातील कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच जुलै व ऑगस्टमध्ये राज्यात झालेली अतिवृष्टी लक्षात घेता आता शहरी भागातही नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. हा निर्णय अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने घेण्यात आला आहे. राज्य शासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ करण्याकरिता रास्त भाव दुकानांची […]
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, अंजली दमानिया वरच्या कोर्टात दाद मागणार
मुंबई : महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनी अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. […]








